नाशिक जिल्ह्यात रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेध, तीन आंदोलक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:06 PM2018-06-01T13:06:16+5:302018-06-01T13:06:16+5:30
नाशिक : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
नाशिक : सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रीय किसान मजदूर महासंघातर्फे पुकारण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सायखेडा येथे आंदोलनादरम्यान तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सिन्नर-शिर्डी महार्गावर तसेच सायखेड्यात शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. लासलगाव येथे लिलाव सुरळित सुरू आहे. परंतु संप असल्याने आवक घटली आहे. आतापर्यंत केवळ कांद्याचे आठ ट्रॅक्टर लिलावासाठी आले असून सरासरी भाव ४०० ते ९५० रूपयांपर्यंत आहे. दिंडोरीतही शेतकरी संप नसला तरी शेतमालाची आवक कमी झाली आहे. पेठमधून मोठ्या प्रमाणात विक्रीस येणाऱ्या आंब्याची आवक आज अत्यंतक कमी झाली तर दररोजचा बाजारही सुरळित सुरू होता. दिंडोरी बाजार समितीत केवळ तीन पिकअप व तीन ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. वणी उपबाजारातही शेतकरी फिरकले नाहीत, त्यामुळे सर्वत्र शुकशुकाटच होता. पिंपळगाव बाजार समितीमध्ये केवळ पाच वाहने लिलावासाठी आली.गेल्या वर्षी १ जून रोजीच राज्यातील शेतकरी संपावर गेले होते व त्याची दखल सरकारला घ्यावी लागली होती. या संपकाळात शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणण्यास नकार दिला तर दूध उत्पादकांनी रस्त्यावर ओतून देत सरकारचा निषेध केला होता. या आंदोलनाला नाशिक जिल्ह्यात हिंसक वळण लागल्याची घटनाही घडली होती. नंतरच्या काळात मात्र नाशिक हेच आंदोलनाचे केंद्रबिंदू झाले होते. केंद्र व राज्य सरकारने शेतकºयांच्या प्रश्नावर फसवणूकच केल्याची भावना व्यक्त करीत आहेत.