महिला अत्याचाराच्या विरोधात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:47 AM2021-01-10T00:47:03+5:302021-01-10T00:47:31+5:30
नाशिक : उत्तर प्रदेशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने शनिवारी सकाळी जनरल पोस्ट कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली, तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविली.

उत्तर प्रदेश सारख्या राज्यात लहान मुली, युवती, अंगणवाडीच्या ५० वर्षीय महिलाही सुरक्षित नाहीत. या घटनांना मुख्यमंत्री अजय बिष्ट हे जबाबदार आहेत. देशातील एका मोठ्या राज्यात होणाऱ्या अशा घटना या देशाचा नाव शरमेने खाली करणाऱ्या आहेत, असा आरोप करून राष्ट्रवादी महिला काँग्रेसने मुख्य टपाल कार्यालय बाहेर निदर्शने केली, तसेच त्याच मुद्द्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अजय बिष्ट याचे नावे पत्रे लिहून ते पोष्टाद्वारे पाठविण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, नीलिमा काळे, पुष्पलता उदावंत, सुवर्णा दोंदे, संध्या भगत, मेघा दराडे, वर्षा लिंगायत, सरला गायकवाड, गायत्री झांजरे, आफरीन सय्यद, रुबीना सय्यद, कल्पना रामराजे, आयशा शेख, चंद्रभागा केदारे आदीं महिला उपस्थित होत्या.