काळ्या फिती लावून निषेधपरीट बांधवांची चांदवडला निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:34 PM2020-09-05T23:34:29+5:302020-09-06T00:49:13+5:30
चांदवड : येथील परीट समाज बांधवांतर्फे तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करीत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले.
चांदवड : येथील परीट समाज बांधवांतर्फे तोंडाला काळ्या फिती बांधून निदर्शने करीत विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. पूर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ट करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग दिल्ली यांनी पाठविलेल्या प्रपत्रामध्ये राज्य शासनाच्या न्याय विभागाने दहा महिने उलटूनसुद्धा माहिती भरून न पाठविलेल्यामुळे शासनाच्या विरोधात आंदोलन केले.
यावेळी तहसीलदार प्रदीप पाटील यांना तालुका परीट समाजाच्या वतीने निवेदन दिले. यावेळी शरद परदेशी, राजू गणपत बोरसे, संतोष परदेशी, प्रकाश परदेशी, राकेश मोहन बोरसे, रामलाल बोरसे, किशोर परदेशी, योगेश बोरसे आदींसह परीट बांधव उपस्थित होते. देशाच्या सतरा राज्यात धोबी समाज अनुसूचित जातीमध्ये आहे तरी इतर जिल्ह्याला लागू असलेल्या सवलती अनुसूचित जातीच्या सवलती बंद करून त्यांना तातडीने ओबीसीमध्ये टाकण्याचे काम सरकारने केले तरी अनुसूचित जातीच्या सवलती मिळाव्यात, असा उल्लेख निवेदनात केला आहे.