केंद्र सरकारविरोधात सीटूच्या वतीने औद्योगिक क्षेत्रात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:16 AM2021-05-27T04:16:11+5:302021-05-27T04:16:11+5:30
सातपूर : कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण ...
सातपूर : कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे आणि दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण झाले तरी अजूनही तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे सीटूच्या वतीने बुधवारी (दि.२६) काळा दिवस पाळून केंद्रातील मोदी सरकारचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत आहेत तरीदेखील मोदी सरकार यावर कोणताही तोडगा काढण्यास तयार नाही. तसेच कामगारांच्या विरुद्ध तयार केलेल्या चार श्रमसंहिता मागे घेण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी व काळ्या कायद्यांचा निषेध करण्यासाठी नाशिक जिल्हा सीटूच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदाेलनात जिल्हाध्यक्ष सीताराम ठोंबरे, सेक्रेटरी संतोष काकडे, तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे, मोहन जाधव, आत्माराम डावरे, अरविंद शहापुरे, दीपक घोरपडे, नितीन सूर्यवंशी, गौतम कोंगळे, निवृत्ती केदार, प्रभाकर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, अंबड, सातपूर, सिन्नर व पिंपळगाव बसवंत आणि इगतपुरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांतील पाच हजारांवर कामगारांनी आपापल्या कंपनीच्या गेटवर घोषणा देऊन निदर्शने केली. सातपूर येथील जुन्या सीटू ऑफिस येथे कॉ. सिंधू शार्दुल यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम कामगारांनी निषेध आंदोलन केले. मालेगाव येथील यंत्रमाग कामगार व सीटूचे कार्यकर्ते रमेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. संजीवनगर भागातील रहिवाशांनीदेखील मोदी सरकारचा निषेध केला.
छायाचित्र आर फोटो २५ सीटू:- सीटू भवनसमोर मोदी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध आंदोलन करताना सीटूचे राज्य अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड. समवेत सीताराम ठोंबरे, संतोष काकडे, तुकाराम सोनजे, कल्पना शिंदे, मोहन जाधव आदींसह कामगार.
===Photopath===
260521\26nsk_45_26052021_13.jpg
===Caption===
सिटू भवनसमोर मोदी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध आंदोलन करतांना सिटूचे राज्यअध्यक्ष डॉ.डी.एल.कराड समवेत सिताराम ठोंबरे, संतोष काकडे,तुकाराम सोनजे,कल्पना शिंदे,मोहन जाधव आदींसह कामगार.