महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:16 AM2021-05-18T04:16:09+5:302021-05-18T04:16:09+5:30
यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील वर्षी कोरोनाच्या पाहिल्या लाटेत तसेच यावर्षी दुसऱ्या लाटेत देखील ...
यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मागील वर्षी कोरोनाच्या पाहिल्या लाटेत तसेच यावर्षी दुसऱ्या लाटेत देखील वीज कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. दुसऱ्या लाटेत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दवाखाने, ऑक्सिजन रुग्णालय, वेंटिलेटर आदी सुविधा सुरळीत सुरू राहावी, याकरिता ते प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. मात्र महाराष्ट्र शासनाकडून त्यांना अद्याप फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा दिलेला नाही. तो नसल्यामुळे त्यांना आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. त्याचप्रमाणे लसदेखील मिळत नाही. त्यासाठी अनेक वेळा दवाखान्यात चकरा माराव्या लागत आहे. याची दखल घेऊन शासनाने फ्रन्टलाईनचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे. याप्रसंगी व्ही. डी. धनवटे, अरुण महसके, दीपक देवरे, समीर वडजे, महेश कदम आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
नाशिकरोड - फ्रंटलाईन वर्कर दर्जा मिळविण्यासाठी निदर्शने करताना व्ही. डी. धनवटे, अरुण म्हसके, दीपक देवरे, समीर वडजे, महेश कदम आदी.