इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगावी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:57+5:302021-05-21T04:16:57+5:30

माजी महापौर रशीद शेख, माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात निषेध फलक घेऊन ...

Protests in Malegaon by Humanitarian Rescue Struggle Committee | इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगावी निदर्शने

इन्सानियत बचाव संघर्ष समितीतर्फे मालेगावी निदर्शने

Next

माजी महापौर रशीद शेख, माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात निषेध फलक घेऊन आंदोलकांनी इस्रायल विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. शेख आसिफ म्हणाले की, इस्त्रायली सरकारच्या क्रौर्य आणि पॅलेस्टाइनच्या विरोधात होते. संयुक्त राष्ट्रात पॅलेस्टाइनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता देणारा भारत पहिला देश होता. १९७४ मध्ये पॅलेस्टाइनला भारताने स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली, त्यानंतर १९८८ आणि १९९६ मध्ये भारतानेही पॅलेस्टाइनला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता दिली. आजही आम्ही पॅलेस्टाइनच्या बाजूने उभे रहावे आणि इस्रायलींच्या अत्याचाराविरुद्ध संयुक्त राष्ट्रामध्ये मतदान करावे व इस्रायल उत्पादक वस्तू बहिष्कृत करून आर्थिकदृष्ट्या कमकुवत करावे, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अतीक कमाल, युसूफ नॅशनलवाला, शेख रफिक, अनीस अझर, असलम अन्सारी, नदीम भाई, रियाज अली, शकील जानी बेग, शफीक बॉक्सर, युथ आयकॉन ग्रुप फारूक कुरेशी महमूद शाह, अब्दुल अहद, इन्सानियत बचाव संघर्ष समिती उपस्थित होते. आंदोलनाचा समारोप हाफीज अनिस अझर यांच्या नेतृत्वाखाली नमाज अदा करण्यात आली. यावेळी पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांनी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवेदनाची प्रत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मेलद्वारे पाठविण्यात आले.

फोटो - २० मालेगाव ३

मालेगावी महामार्गावर सवंदगाव फाट्यावर इंसानियत बचाव संघर्ष समितीतर्फे निदर्शने करताना माजी आमदार आसिफ शेख, रशीद शेख, युसूफ नॅशनलवाला,अतिक कमाल, अस्लम अन्सारी आदी.

===Photopath===

200521\20nsk_25_20052021_13.jpg~200521\20nsk_26_20052021_13.jpg

===Caption===

मालेगावी सवंदगाव फाट्यावर इंसानियत बचाव संघर्ष समितीतर्फे निदर्शने करण्यात आली त्यावेळी पोलीस उपअधीक्षक लता दोंदे यांचेशी बोलताना माजी आमदार आसिफ शेख व पदाधिकारी कार्यकर्ते.~मालेगावी महामार्गावर सवंदगाव फाट्यावर इंसानियत बचाव संघर्ष समितीतर्फे निदर्शने करताना माजी आमदार आसिफ शेख, रशीद शेख, युसूफ नॅशनलवाला,अतिक कमाल, अस्लम अन्सारी आदी.

Web Title: Protests in Malegaon by Humanitarian Rescue Struggle Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.