नाशिकरोडला निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:16 AM2021-09-27T04:16:00+5:302021-09-27T04:16:00+5:30
भारतीय संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सोमवार भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी बहुजन ...
भारतीय संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सोमवार भारत बंदचे आवाहन करण्यात आले असून भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिकरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ निर्दशने करण्यात आली.
केंद्र सरकारचे शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करा, आधारभूत किमतीचा कायदा करा, वीज विधेयक रद्द करा या मागण्या केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने सोमवारी भारत बंदमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव खालकर, निवृत्ती अरिंगळे आदींनी केले आहे. निदर्शने आंदोलनामध्ये रमेश औटे, मनोहर कोरडे, नगरसेवक जगदीश पवार, नामदेव बोराडे, धनाजी आरिंगळे, समाधान कोठुळे, विनोद गांगुर्डे, जावेद पठाण, सागर शिंदे, तौफिक पठाण, राजु पवार, डॉ. युवराज मुठाळ, संतोष गिरजे, नियामत शेख, प्रथमेश पवार, मधुकर सातपुते, तुषार काळे आदी सहभागी झाले होते.
------------------
फोटो (२६नाशिकरोड निदर्शने)
नाशिकरोड शिवाजी पुतळा येथे भारतीय संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सोमवारी भारत बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेच्या निदर्शने करतांना बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोकराव खालकर, निवृत्ती अरिंगळे,रमेश औटे, मनोहर कोरडे, जगदीश पवार, नामदेव बोराडे, धनाजी आरिंगळे आदी.