खाजगीकरण विरोधात आरटीओ कार्यालयात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:11 AM2021-07-08T04:11:45+5:302021-07-08T04:11:45+5:30
शासन प्रादेशिक परिवहन विभाग खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. खासगीकरण झाले तर कर्मचाऱ्यांवर गदा येईल शिवाय नागरिकांना वाहन संबंधित कामांसाठी ...
शासन प्रादेशिक परिवहन विभाग खासगीकरण करण्याच्या तयारीत आहे. खासगीकरण झाले तर कर्मचाऱ्यांवर गदा येईल शिवाय नागरिकांना वाहन संबंधित कामांसाठी अडचणी निर्माण होतील तसेच कार्यालयातील मनुष्यबळ कमी होईल त्यामुळे खासगीकरण करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून निदर्शने केली. यावेळी ‘बंद करा, बंद करा, खासगीकरण बंद करा’, ‘कर्मचारी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. या आंदोलनात मोटार वाहन कर्मचारी संघटनेचे विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर करंजकर, हर्षल माळी, अनुप वाघ, भरत चौधरी, संतोष नाईक, संतोष पाटील, पंढरीनाथ आडके, शंकर दिवटे, अमोल मुंढे, आर के हरळ, सिरीन शहा, वैशाली सोनवणे, आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.
(फोटो ०७ आरटीओ)