भटके विमुक्त समाज परिषदेतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:42 AM2019-08-15T01:42:27+5:302019-08-15T01:42:46+5:30
भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिकरोड : भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बुधवारी (दि. १४) एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
भटके विमुक्त समाज विकास परिषदेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जाती समाजाच्या योजना, धनगर समाजाला लागू झालेल्या योजना भटके-विमुक्त समाजाच्या जातींना लागू कराव्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीप्रमाणे महामंडळे व बँकांनी सुशिक्षित बेरोजगारांना दिलेले कर्ज माफ करण्यात यावे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाप्रमाणे वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत योजना राबविण्यात याव्या, भटके विमुक्तांसाठी यशवंतराव चव्हाण वसाहत मुक्त योजना निधीतून तत्काळ घरे बांधण्यात यावी, जात पडताळणीसाठी भटक्या-विमुक्तांच्या समाजासाठी लावलेली १९६१ ची पुराव्याची अट शिथिल करण्यात यावी, विदेशात शिक्षणासाठी समाज कल्याणकडून कर्ज व शिष्यवृत्ती देण्यात यावी, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे नाव देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
धरणे आंदोलनास भटके विमुक्त समाज विकास परिषदेचे अध्यक्ष रतन सांगळे, मांगूलाल जाधव, सोमनाथ मोहिते, बाळासाहेब नळवाडे, नवनाथ ढगे, उमेश पिंपळे, गिरिजा चौथे, आशा मोहिते, रंजना जाधव, सुनंदा बाविस्कर, रेणुका पिंपळे, बाळासाहेब नळवाडे, डी. के. गोसावी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.