गोंदे दुमालात कामगारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 09:38 PM2020-07-03T21:38:14+5:302020-07-04T00:30:45+5:30
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून, कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कमी केल्याचा आरोप करीत कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच कुटुंबासह निदर्शने केली. वीर इलेक्ट्रो कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसल्याने कंपनी प्रशासनाने वाडीवºहे पोलिसांना माहिती दिली.
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला औद्योगिक वसाहतीतील वीर इलेक्ट्रो इंजिनिअरिंग कंपनीमध्ये आठ कामगार कंत्राटी पद्धतीने काम करत असून, कंपनीकडून कंत्राट संपल्याच्या नावाखाली कमी केल्याचा आरोप करीत कामगारांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावरच कुटुंबासह निदर्शने केली. वीर इलेक्ट्रो कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून बसल्याने कंपनी प्रशासनाने वाडीवºहे पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस, कंपनी प्रशासन व कामगार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये कंपनीकडून लेखी करार करून दोन कामगारांना कामावर घेण्याचे ठरले. सहा कामगारांना १ आॅगस्टपासून कामावर घेण्याचे आश्वासन दिल्याचे देवीदास आडोळे यांनी माहिती देताना सांगितले.