१५ गुणवंत शिक्षिकांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 06:02 PM2019-01-23T18:02:42+5:302019-01-23T18:03:20+5:30
कळवण : प्राथमिक शिक्षक समितीचा उपक्रम
कळवण : प्राथमिक शिक्षक समितीच्या कळवण शाखेतर्फेतालुक्यातील दोन महिला केंद्रप्रमुख व १३ महिला शिक्षिकांना राजमाता जिजाऊ व क्र ातिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजमाता जिजाऊ व क्र ांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार व आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांचे कार्य सुरू असून राज्यातील शिक्षक संघटनेची एकमेव कळवण शाखा दरवर्षी महिलांचा सन्मान कार्यक्र माचे आयोजन करते हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन कळवण पंचायत समितीच्या उपसभापती पल्लवी देवरे यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्र माप्रसंगी गटशिक्षणाधिकारी हेमंत बच्छाव, विस्तार अधिकारी दिलीप पवार, राज्य कोषाध्यक्ष केदू देशमाने, आनंदा कांदळकर, पी.के.आहेर, संजय शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पुरस्कारार्थी महिला निशादेवी गिरी, दीपाली पगार, धनश्री जाधव, मंदाकिनी जाधव आदींनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक समितीचे सरचिटणीस भास्कर भामरे यांनी डिजीटल युगात प्राथमिक शिक्षकांची असाधारण भूमिका असतांना जिल्हा परिषदेचा सावित्रीबाई फुले शिक्षिका पुरस्काराचा सलग तीन वर्षापासून हा कार्यक्र म होवू शकला नाही. मात्र एकमेव कळवण शाखेने महिलांचा सन्मान दरवर्षीप्रमाणे घडवून आणला याचा मनस्वी आनंद असून शिक्षकांसाठीची विधायक कामे व नवनवीन उपक्र म राबविणार असल्याचे घोषित केले. कार्यक्र मास प्रकाश सोनवणे, प्रकाश आहिरे, वामन खैरनार, जिभाऊ बच्छाव, भाऊसाहेब पवार, मंजुषा आहिरे, सुरेखा मराठे, प्रभाकर चव्हाण, साहेबराव पवार, हेमंत पवार यांचेसह संजय शिंदे, भास्कर भामरे, सतीश आहेर, दादाजी देवरे, रामदास वाघ, नितीन बिरारी, दिलीप पाटील, विकास सोनवणे, दिपक वाघ, पंडीत जाधव, सप्तर्षी शेवाळे, सिताराम सुर्यवंशी, नामदेव देशमुख आदी उपस्थित होते. हेमंत सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले. कार्याध्यक्ष योगेश आहिरे यांनी आभार मानले.
यांचा झाला सन्मान
केंद्रप्रमुख निशादेवी गिरी (कळवण), केंद्रप्रमुख मंदाकिनी जाधव (पाळे),दीपाली पगार (नाकोडे), जयश्री जगदाळे (कळवण ), रूपाली गायकवाड (रवळजी), सरला अहिरराव (पाटविहीर), कुसुम रौंदळ (शिरसमणी), सुनंदा शिरसाठ (नरूळ), माधुरी भामरे (नवी बेज), संगिता राऊत (चिखलीपाडा), धनश्री जाधव (बेटकीपाडा), यमुना चौरे (कुमसाडी), सविता पवार (पाळे खुर्द), माधुरी पवार (भांडणे पि.), चंद्रकला पवार (दत्तनगर).