अभिमानास्पद ! अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 07:40 AM2019-02-17T07:40:20+5:302019-02-17T07:40:52+5:30

संडे अँकर । त्यांच्या घरातच तळपते तलवार; १६ पुरस्कार फक्त तलवारबाजीचे, नाशिकला ५६ पुरस्कार

Proud! Akhke family 'Shiv Chhatrapati Award winner' | अभिमानास्पद ! अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते’

अभिमानास्पद ! अख्खे कुटुंबच ‘शिवछत्रपती पुरस्कार विजेते’

googlenewsNext

संदीप भालेराव

नाशिक : क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न नाशिकच्या दुधारे कुटुंबीयांनी साकार केले असून, अख्खे कुटुंबीयच शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. या कुटुंबातील तिघांनी तलवारबाजीत हा पुरस्कार मिळविला आहे.
अशोक दुधारे यांनी तलवारबाजी खेळ रुजविला. शाळेतील मुलांना शिकवितांनाच यांनी मुलगा अजिंक्य व मुलगी अस्मिता यांनाही तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले. त्यांना २००१ मध्ये क्रीडा कार्यकर्ता व २००९ मध्ये क्रीडा मार्गदर्शक म्हणून शिवछत्रपती पुरस्कारांने सन्मानित केले आहे. अजिंक्यने राष्ट्रीय स्पर्धांत २१ सुवर्ण, राज्य स्पर्धांत ७० सुवर्ण पदके मिळवून तीनदा जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याला २००९-१० मध्ये शिवछत्रपती पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

कुटुंबातच तलवार तळपली : महाराष्ट्रात तलवारबाजी खेळ रूजविण्यासाठी गेल्या २० वर्षापासून प्रयत्न केल्यानंतर कुठे या खेळाला ओळख मिळू लागली आहे. आमच्या कुटुबीयांचा सहभाग असल्याने निश्चितच समाधान आहे. कुटुंबातच तलवार तळपल्याने दुधारे म्हटले की तलवारबाजी असे जणू समीकरणच असे लोक मानतात. याचा अभिमान वाटतो. छत्रपतींच्या नावाने खेळातील हा सर्वोेच्च सन्मान कुटूंबात असणे गौरवाची बाब आहे.
- अशोक दुधारे, प्रशिक्षक, नाशिक (दोनदा छत्रपती पुरस्कार विजेते )

मुलगी आणि सूनबाईही जोरात
अशोक दुधारे यांच्या सुनबाई, अजिंक्य यांची पत्नी कोमलप्रीत पंजाबची तलवारबाज असून, तिने राष्टÑीय स्पर्धांमध्ये २० सुवर्ण, ३१ रौप्य आणि १६ कांस्य पदके; पटकावली. तिला ३५ आंतरराष्टÑीय स्पर्धांचा अनुभव आहे. आंतरराष्टÑीय पातळीवर दोन सुवर्ण तिने पटकाविली आहेत. मुलगी अस्मिताला २०१४/१५ मध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. तिने राष्टÑीय स्पर्धेत ३ सुवर्ण, राज्य स्पर्धांमध्ये ३१ सुवर्णपदके कमाविली आहेत. दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धांचाही तिला अनुभव आहे.

Web Title: Proud! Akhke family 'Shiv Chhatrapati Award winner'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.