शेतकऱ्यांना आठ तास सुरळीत वीजपुरवठा करा
By admin | Published: December 23, 2016 12:05 AM2016-12-23T00:05:43+5:302016-12-23T00:05:54+5:30
बैठक : राजाभाऊ वाजे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील वावी, पाथरे, देवपूर, वडांगळी या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी आठ तास सुरळीत वीजपुरवठा करण्याच्या सूचना आमदार राजाभाऊ वाजे यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
शहा येथील कामाची पाहणी करून डिसेंबर अखेर ते पूर्ण करण्याची ग्वाही कुमठेकर यांनी शेतकऱ्यांना दिली. जळालेले रोहित्र तातडीने बदलून देण्याच्या सूचनाही वाजे यांनी यावेळी केल्या. आमदार निधीतून नवीन रोहित्र बसविण्यासाठी त्या जागेसह प्रस्ताव तयार करण्याचे आदेशही यावेळी कुमठेकर यांच्यासह जिल्हा अभियंता व तालुका अभियंता यांना दिले.
याप्रसंगी शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गोकूळ नरोडे, गटप्रमुख दशरथ हांडोरे, नवनाथ वाघचौरे, शिवनाथ जाधव, कारवाडीचे सरपंच साहेबराव जाधव, शहाचे सरपंच गणेश जाधव, भरतपूरचे सरपंच भाऊलाल कारले, पाथरेचे सरपंच मच्छिंद्र चिने, खरेदी-विक्री संघाचे संचालक आर. आर. जाधव, प्रशांत कुलकर्णी, काशिनाथ जाधव, डॉ. एन. डी. जाधव, संदीप गवांदे, नवनाथ जाधव, भाऊसाहेब थोरात, भाऊसाहेब विघ्ने, दादासाहेब जाधव, बाळासाहेब जाधव आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)