"पुरावे द्या; पार्टीतील प्रत्येकावर कारवाई"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 03:53 PM2023-12-21T15:53:03+5:302023-12-21T15:53:19+5:30

नितेश राणे : जातीनिहाय जनगणनेला विरोधच.

Provide evidence we will take action against everyone in the party | "पुरावे द्या; पार्टीतील प्रत्येकावर कारवाई"

"पुरावे द्या; पार्टीतील प्रत्येकावर कारवाई"

नाशिक : सलीम कुत्ता आणि बडगुजर प्रकरणी मी सभागृहात दाखवलेल्या व्हिडीओबाबत माझ्याकडे सबळ पुरावे आहेत. आरोप करणाऱ्या इतरांनी पुरावे द्यावेत, त्यांच्यावरही कारवाई होईल. अतिरेकी कारवाईत जात धर्मापलिकडे जाऊन विचार करावा लागतो. भाजपाचा पदाधिकारी पार्टीत सहभागी असल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल असे प्रतिपादन भाजप आमदार नितेश राणे यांनी केले. 

नाशिकरोड येथील साने गुरुजी शिक्षण मंडळाच्या कार्यक्रमाला आले असता पत्रकार परीषदेत ते बोलत होते. बडगुजर प्रकरणावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. हे प्रकरण एसआयटीकडे आहे. त्यामुळे त्याच्यावर आता काही बोलणार नाही. मात्र यासाठी नाशिकमध्ये येऊनच स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. अतिक्रमणला अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांमुळेच शहरात अंमली पदार्थांचा व्यवसाय वाढला. आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे यांनी त्यावर वारंवार आवाज उठवूनही काही पोलिस अधिकाऱ्यांनी त्याला पाठीशी घातले. गाडीच्या डिक्कीतून ड्रग्जची वाहतूक करतानाचे पुरावे माझ्याकडे आहेत. पोलिस आयुक्तांशी मी यावर चर्चा केली आहे. महापालिका आयुक्तांनीही अतिक्रमणाविरोधात कारवाई केली पाहिजे. जर अशा धंद्यांना पाठीशी घातले जात असेल तर भविष्यात शासनाकडून होणाऱ्या कारवाईला तयार राहा असा इशाराही त्यांनी दिला. 

"जातनिहाय जनगणनेला विरोधच"

जातनिहाय जनगणनेला संघाने केलेला विरोध योग्यच असून हिंदूंना जाती जातीत विभागण्याचे षडयंत्र यामागे असल्याचा आरोप त्यांनी केला. मराठा समाजाला कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले जाईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मंत्री छगन भुजबळ जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरीत असतील तर त्यांचे मन वळवले जाईल, असेही राणे म्हणाले.  

"पार्टीत जाणाऱ्या पोलिसाला बडतर्फ करू"

पोलिस अधिकारी गणवेश घालून इफ्तार पार्टीसह इतर पार्ट्यांमध्ये सहभागी होत असतात. अशा पोलिसांचे फोटो अथवा व्हिडीओ माझ्याकडे पाठवा, त्यानंतर तो अधिकारी पुन्हा पोलिसाचा गणवेश घालणार नाही याची खात्री देतो असा दमही राणे यांनी दिला.

Web Title: Provide evidence we will take action against everyone in the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.