छावणी परिषदेला आरोग्य सुविधा द्या; सर्वपक्षीय मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:56+5:302021-04-16T04:13:56+5:30
कोरोना काळात छावणी परिषदेच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाले. मात्र, कर्मचारी व डॉक्टरांची संख्या न वाढविल्याने छावणी परिषदेच्या रुग्णालयात ...
कोरोना काळात छावणी परिषदेच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरू झाले. मात्र, कर्मचारी व डॉक्टरांची संख्या न वाढविल्याने छावणी परिषदेच्या रुग्णालयात रुग्णांची सोय करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. छावणी प्रशासनाला जिल्हा प्रशासन मागील वर्षीपासून मनुष्य पुरवठा करू शकलेले नाही. याशिवाय जिल्हा आरोग्य विभागाकडून ऑक्सिजनसाठी काही मार्गदर्शनही मिळालेले नाही. डायलिसिसकरिता असलेल्या बेडचा ऑक्सिजन बेडकरिता वापर होऊ शकतो. मात्र, छावणीच्या दवाखान्यात ऑक्सिजन नियंत्रण करणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती केलेली नाही. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांसह आरोग्य यंत्रणेने कार्यरत होण्याची गरज असून, औषधे व यंत्रणा तातडीने उपलब्ध करण्याची मागणी छावणी परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे, बाबुराव मोजाड, तानाजी करंजकर, जीवन गायकवाड, शिवसेनेचे संजय गोडसे, चंद्रकांत गोडसे, तानाजी भोर, प्रवीण पाळदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे, रतन चावला, ॲड. बाळासाहेब आडके, सोमनाथ खताळे, काँग्रेसचे ॲड. अशोक आडके, मोहन करंजकर आदिंनी केली आहे.