कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान तात्काळ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 10:49 PM2019-09-23T22:49:51+5:302019-09-23T22:51:15+5:30
कळवण : कळवण येथील बाजार समितीत नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांदा विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली आहे.
कळवण : कळवण येथील बाजार समितीत नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यामध्ये कांदा विक्र ी केलेल्या कांदा उत्पादक शेतकºयांना तात्काळ अनुदान द्यावे अशी मागणी पात्र लाभार्थी शेतकºयांनी केली आहे.
गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कळवण बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली होती. परिणामी कांद्याचे दर कोसळले होते. त्याचा कांदा उत्पादक शेतकºयांना फटका बसला होता.
उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात कांदा विकला गेल्याने शेतकºयांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनाला यश येऊन शासनाने सत्य परिस्थिती जाणून घेत शेतकºयांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल २०० रु पये अनुदान जाहीर केले होते. या अनुदानासाठी कळवण सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या माहिती नुसार कळवण तालुक्यात ११ हजार ९३९ इतके पात्र लाभार्थी ठरले असून त्यासाठी ११ कोटी ६ लाख ३० हजार ९३४ रुनये अनुदान मंजूर झाले होते.
७ हजार ७७४ शेतकºयांना ७ कोटी ५५ लाख ४६ हजार ८४० रु पयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. अजून ९८१ शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांना आपले हक्काचे अनुदान तात्काळ देण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील वंचित शेतकºयांनी केली आहे.
गेल्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात कळवण बाजार समितीत उत्पादन खर्चापेक्षा अल्प दरात कांदा विकला होता. त्यामुळे शेतकºयांना मोठी आर्थिक अडचण सहन करावी लागली होती. नऊ महिने उलटूनही शेतकºयांच्या खात्यावर अनुदान जमा झालेले नाही. तात्काळ अनुदान जमा करावे.
- विजय पगार, कांदा उत्पादक शेतकरी, कळवण.
लाभार्थी शेतकरी रक्कम
पात्र शेतकरी - ११९३९ --- ११,०६,३०,९३४
प्रस्ताव (लाभार्थी शेतकरी ) - ८७५५ --- ८,५३,२४,०४८
अनुदान वाटप शेतकरी - ७७७४ --- ७.५५,४६,८४०
वंचित शेतकरी - ९८१--- ९६,७७,२०८