विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात इंटरनेट सुविधा द्या : थोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 10:37 PM2020-08-06T22:37:43+5:302020-08-07T00:33:17+5:30
चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेताना बऱ्याच अडचणी येत असून, त्यांना सवलती द्याव्यात, अशी मागणी प्रसिद्ध कवी व गीतकार विष्णू थोरे, अमोल दीक्षित यांनी चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
चांदवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण घेताना बऱ्याच अडचणी येत असून, त्यांना सवलती द्याव्यात, अशी मागणी कवी व गीतकार विष्णू थोरे, अमोल दीक्षित यांनी चांदवडचे प्रांताधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशभर व राज्यात कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आर्थिक आणि शैक्षणिक व्यवस्था कोलमडली आहे. मजुरांच्या हाताना काम नाही, शेतमालाला भाव नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशातच सुरू असलेल्या आॅनलाइन शाळा आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न चिंतनीय आहे. अनेक पालकांकडे साधे मोबाइल आहेत. इंटरनेट वापरता येईल असे अॅण्ड्रॉइड मोबाइल नाहीत. ज्यांच्याकडे मोबाइल आहेत त्यांच्याकडे नेट मारण्याकरिता पुरेसे पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण झाले आहे. त्यामुळे मोबाइल कंपनीकडून विद्यार्थी प्लॅन तयार करून नेटसाठी सवलत द्यावी, अशी मागणी विष्णू थोरे, अमोल दीक्षित यांनी केली आहे.