कामे नियोजनाच्या याद्या बांधकाम विभागाला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:16 AM2021-03-10T04:16:35+5:302021-03-10T04:16:35+5:30

या सभेत किरण थोरे यांनी म्हरळगोई येथील शाळा निर्लेखित होऊन वर्षाचा कालावधी उलटला तरीदेखील शाळा पाडली जात नाही. जर ...

Provide work planning lists to the construction department | कामे नियोजनाच्या याद्या बांधकाम विभागाला द्या

कामे नियोजनाच्या याद्या बांधकाम विभागाला द्या

Next

या सभेत किरण थोरे यांनी म्हरळगोई येथील शाळा निर्लेखित होऊन वर्षाचा कालावधी उलटला तरीदेखील शाळा पाडली जात नाही. जर भविष्यात ही शाळा कोसळून अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न शिक्षणाधिकाऱ्यांना विचारला. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारतही निर्लेखित झाली असून, या ठिकाणी कुत्र्यांचा वावर असल्याची बाब थोरे यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर चालू आर्थिक वर्षात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तरतूद करण्यात आली असून, नवीन इमारत बांधण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. याच वेळी भास्कर गावित यांनी सुरगाणा तालुक्यातील काही गावांमध्ये शौचालयांची कामे होऊनही ग्रामस्थांना शौचालयाचे अनुदान मिळाले नसल्याची तक्रार केली. या सभेस उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, सुशीला मेंगाळ, सुरेखा दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे उपस्थित होते.

चौकट====

पिंपळगावला होणार फायर स्टेशन

ग्रामपंचायत विभागाने नागरी सुविधेच्या कामांचे नियोजन पूर्ण केले असून, यातील काही निधीतून पिंपळगाव बसवंत येथे अग्निशमन केंद्र उभारण्याचे सूतोवाच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले. त्यासाठी निधी पुरेसा नसला तरी, जिल्हा नियोजन समितीकडून अतिरिक्त निधी मिळावा म्हणून प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Provide work planning lists to the construction department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.