भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांचा संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2019 12:59 AM2019-08-29T00:59:58+5:302019-08-29T01:00:22+5:30
वेतनश्रेणी, पदोन्नती, नोकर भरती आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात नाशिकचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.
सातपूर : वेतनश्रेणी, पदोन्नती, नोकर भरती आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात नाशिकचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम झाला.
भविष्य निधी कर्मचाऱ्यांच्या ९ डिसेंबर २०१५ पासून पदोन्नती, वेतनश्रेणी, नोकर भरती यांसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. कर्मचाºयांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून वारंवार फक्त आश्वासने दिली जातात. वेतन श्रेणीप्रमाणे कर्मचाºयांची भरती होत नसल्याने काळ्या फिती लावून आंदोलन केले. धरणे आंदोलन करून शांततेच्या मार्गाने निषेध केला. तरीही कोणताही मार्ग निघालेला नसल्याने अखेर बुधवारी एकदिवसीय संप पुकारण्यात आला. या संपात द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी व चतुर्थ श्रेणीचे १०३ अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे सर्वच कामकाजावर परिणाम झाला.
दिल्लीच्या मुख्यालयातील व्यवस्थापनाला आतापर्यंत महासंघाचे जनरल सेक्रेटरी कृपाकरन यांनी जवळपास १०१ पत्रं पाठवली आहेत. परंतु मुख्य कार्यालयाकडून आतापर्यंत एकही उत्तर देण्यात आले नाही. व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्यासाठी अधिकाºयांना संपाची हाक द्यावी लागली, अशी माहिती कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी रमन पवार यांनी दिली. संपात युनियनचे उपाध्यक्ष अनिल पवार, देवेंद्र झा, बाळकृष्ण उशिरे, नितीन पाठक, सतीश सोनकुसरे, राजेश गुप्ता, राजाराम गाढवे, पुंडलिक कटाळे, ललित लहामगे, किशोर महाजन आदींसह महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.
नाशिकच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ५४ टक्के जागा रिक्त आहेत. त्यांचा कामाचा भार अन्य अधिकारी आणि कर्मचाºयांवर येत आहे. सेवानिवृत्तीचे प्रमाण वाढत आहे. नवीन कर्मचाºयांची नियुक्ती केली जात नाही. लिपिक पदाच्या १४६ जागा मंजूर आहेत. प्रत्यक्षात ६२ लिपिक काम करीत आहेत. अकौंट विभागासाठी ५३ कर्मचारी अपेक्षित आहेत. प्रत्यक्षात फक्त १८ कर्मचारी काम करीत आहेत.