ई-वे बिल प्रणालीतील तरतूद कायम ठेवावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:42 AM2021-01-08T04:42:30+5:302021-01-08T04:42:30+5:30

नाशिक: ई- वे बिल प्रणालीतील २४ तासात १०० किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट ...

Provision in e-way billing system should be maintained | ई-वे बिल प्रणालीतील तरतूद कायम ठेवावी

ई-वे बिल प्रणालीतील तरतूद कायम ठेवावी

googlenewsNext

नाशिक: ई- वे बिल प्रणालीतील २४ तासात १०० किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट तसेच नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील बिलातील तरतुदीत करण्यात आलेला महत्त्वाचा बदल १ जानेवारी २०२१ पासून लागू झाला. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते. त्यानुसार प्रत्येक १०० किलोमीटरला एक दिवस वाढत जात असे, मात्र नव्या नियमात बदलानुसार १०० ऐवजी २०० किलोमीटर प्रतिदिन असा कालावधी देण्यात आला आहे. एक हजार किलोमीटरकरिता या नियमानुसार पाच दिवस मिळत असून, त्याचा कालावधी संपला तर ऑनलाइन त्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तरतुदीमुळे गैरप्रकारांना आळा बसणार असला तरी यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मात्र अडचणीत आला असल्याचे निवेदन म्हटले आहे.

एकीकडे जागतिक मंदी आणि त्यानंतर गतवर्षी कोरोनाचे संकट यातून सावरत आता कुठेतरी उद्योग व्यवसाय सुरळीत होत असताना अशा अडचणी उभ्या राहिल्याने ट्रान्सपोर्ट व्यावसायिक व उद्योजकांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला आहे. ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांना अर्ध्या गाडीचा मालक असल्याने दुसरा माल जमा करायला वेळ लागतो. यामुळे भाडे विभागले जाते याचा फायदा उद्योजकांना मिळतो. या तरतुदीमुळे अनेक जणांचा माल एकाच गाडीत एकत्र करून वेळेत पोहोचणे अडचणीचे ठरत असून यामुळे संबंधित त्याचे भाडे इंधन वाया जात आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसेच उद्योजकांना बसत आहे. त्यामुळे ई- वे बिल प्रणालीतील २४ तासात १०० किलोमीटर अंतराची तरतूद कायम ठेवण्यात यावी अशी मागणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व नाशिक गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन पी.एम. सैनी यांनी केली आहे.

Web Title: Provision in e-way billing system should be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.