विद्यार्थी कल्याणकारी योजनांसाठी ५ कोटी रुपयांची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:17 AM2021-02-09T04:17:12+5:302021-02-09T04:17:12+5:30
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत डॉ. सचिन मुंबरे यांनी ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत डॉ. सचिन मुंबरे यांनी अर्थसंकल्प सादर केला. तर लेखा अहवाल डॉ. आशुतोष गुप्ता यांनी सादर केला. बैठकीस कुलसचिव डॉ.कालिदास चव्हाण व अधिसभा सदस्य बैठकीस उपस्थित होते. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाशी संबंधित माहिती, योजनांची सर्व माहिती विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठाने तयार केलेले ॲप अद्ययावत करण्यासाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी या सभेचे संचलन केले. दरम्यान, कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अधिसभेतर्फे त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
इन्फो-
अर्थसंकल्पात ४९१ रुपये तूट
विद्यापीठाच्या सन २०२१ -२२ अर्थसंकल्प परिरक्षण विकास, स्वतंत्र प्रकल्प व योजना या तीन प्रकारात विभागला आहे. त्यासाठी विद्यापीठाचे एकत्रित उत्पन्न ३५१ कोटी २५ लाख रुपयांपर्यंत मिळणे अपेक्षित आहे. उत्पन्नाच्या तुलनेत ३५६ कोटी १६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे २०२१ -२२ शैक्षणिक वर्षात विद्यापीठाला ४ कोटी ९१ लाख रुपयांची वित्तीय तूट भरून काढण्याचे आव्हान असणार आहे.
इन्फो-
अर्थसंकल्पातील लक्षवेधी तरतुदी
संशोधन प्रयोगशाळांची निर्मिती - १० लाख
ई -लर्निंग सेंटर - १ कोटी
कर्मचारी, प्राधिकरण सदस्य आकस्मित मृत्यू अनुदान ५० लाख
प्राधिकरण सदस्यांच्या सहभागासाठी १कोटी
कोट -