खड्डेमुक्त महाराष्टÑसाठी सात हजार कोटीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:15 PM2018-02-13T15:15:28+5:302018-02-13T15:17:02+5:30
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियान हाती घेतले त्यानुसार राज्यात ५७ हजार किलो मीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे
नाशिक : खड्डेमुक्त महाराष्टÑ अभियान यशस्वी करण्यासाठी पुर्वी २८०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती, आता त्यात वाढ करण्यात आली असून, सात हजार कोटी रूपये या अभियानासाठी खर्च करण्यात येणार असल्याने राज्यातील रस्त्यांसाठी निधी वाढविल्याने आता दुरूस्तीचे कामे तातडीने केली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. खड्यांबरोबरच नाशिक जिल्ह्यात सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरूस्तीची कामेही हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सायंकाळी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाग कार्यालयात अधिका-यांची बैठक घेत कामकाजाचा आढावा घेतला. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने राज्य सरकारने महाराष्ट्र खड्डेमुक्त अभियान हाती घेतले त्यानुसार राज्यात ५७ हजार किलो मीटर लांबीच्या रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम करण्यात आले आहे. या कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्यात येतअसून, या अभियानात चांगली कामगिरी करणाºयांचे कौतुक करण्यासाठी राज्यभर दौरा केला. नाशिक हा शेवटचा जिल्हा असल्याने नाशिकच्या अधिका-यांनीही चांगले काम केल्याचे ते म्हणाले. यावेळी पाटील यांच्या हस्ते चांगले काम करणा-या ५०हून अधिक अधिका-यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
बैठकीच्या प्रारंभी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांनी नाशिक जिल्ह्याचा आढावा सादर केला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नाशिक मंडळात सन २०१७ च्या अर्थसंकल्पात ४४ कामे मंजूर असून, चार पुलांची कामे सुरू आहेत. रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम शंभर टक्के पुर्ण झाले. जेट पॅचद्वारे खड्डे भरण्यात येत असल्याने ही कामे टिकाऊ असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच राज्यात काही ठिकाणी पुल कोसळण्याच्या घटना पाहता नाशिक जिल्ह्यातील सुस्थितीत नसलेल्या ७० पुलांच्या दुरूस्तीचे कामे करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. यावेळी आमदार जे. पी. गावीत, मुख्य अभियंता एच. एस. पगारे, कार्यकारी अभियंता एस. एस. पाटील उपस्थित होते.