पेटलेल्या अवस्थेत मंदिराला प्रदक्षिणा

By Admin | Published: June 19, 2017 01:33 AM2017-06-19T01:33:13+5:302017-06-19T01:33:36+5:30

नाशिकरोडची घटना : मनोविकारग्रस्ताच्या कृ त्याने परिसरातील नागरिक भयभीत

Proximity to the temple in the incandescent state | पेटलेल्या अवस्थेत मंदिराला प्रदक्षिणा

पेटलेल्या अवस्थेत मंदिराला प्रदक्षिणा

googlenewsNext

नाशिक : पंधरा वर्षांपासून घरातून निघून गेलेल्या आणि पाच महिन्यांपूर्वीच पुन्हा घरी परतलेल्या एका इसमाने अत्यंत विचित्र पद्धतीने स्वत: आयुष्य संपविले. या मनोविकारग्रस्त इसमाने रविवारी (दि.१८) पहाटेच्या सुमारास हातांच्या नसा कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. या इसमाने पेटलेल्या अवस्थेतच परिसरातील मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्याचेही पोलिसांनी सांगितले. या घटनेविषयी याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नाशिकमधील जेलरोड भागातील मॉडेल कॉलनीमधील आविष्कार अपार्टमेंटमधील रहिवासी असलेले सुभाष रामराव डोईफोडे (५८) या इसमाने विचित्र पध्दतीने आत्महत्या केली. पहाटेच्या सुमारास सर्व झोपलेले असताना डोईफोडे यांनी हातांची नस कापून घेत रक्तबंबाळ अवस्थेत अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेत परिसरातील मंदिर गाठले. त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घातल्या आणि रक्ताचे शिंतोडे मंदिराच्या परिसरात उडविले. या प्रकारात डोईफोडे यांचा मृत्यू झाला आहे.
दोन्ही हातांच्या नसांना व गुप्तांगाला जखमी करून घेत व रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून डोईफोडे घराबाहेर पडल्याचे त्यांच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी आरडाओरड केली, मात्र डोईफोडे मागे न बघता वेगाने मंदिराच्या दिशेने पळाले. आग मोठी असल्याने कोणीही त्यांच्याजवळ जाऊ शकले नाही. मंदिराला प्रदक्षिणा घालताना ते जळालेल्या अवस्थेत कोसळल्याचे फिर्यादित म्हटले आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा हितेश याने दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अग्निशमन दलाने मंदिराचा परिसर पाण्याने स्वच्छ करून घेतला.

Web Title: Proximity to the temple in the incandescent state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.