बलिप्रतिपदेनिमित्ताने रेड्यांची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:51 PM2017-10-22T23:51:43+5:302017-10-23T00:16:09+5:30

Pruning procession of bellipatipadamita | बलिप्रतिपदेनिमित्ताने रेड्यांची मिरवणूक

बलिप्रतिपदेनिमित्ताने रेड्यांची मिरवणूक

Next

पंचवटी : बलिप्रतिपदा (पाडवा) निमित्ताने शुक्रवारी (दि. २०) सायंकाळी पंचवटी परिसरात रेड्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दिवाळीच्या दुसºया दिवशी बलिप्रतिपदेला रेड्यांची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.  ढोल -ताशांच्या गजराज तसेच गुलालाची उधळण करून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत दुग्ध व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  सायंकाळी रेड्यांना आकर्षक सजावट करून त्यांच्या पाठीवर विविध संदेश रंगविण्यात आले होते. रेड्यांच्या पाठीवर काढलेले विविध देवदेवतांची चित्रे, अवयवदानाचे संदेश, प्रदूषण रोखणे काळाची गरज, बेटी बचाव हे संदेश लक्ष वेधून घेत होते. सायंकाळी दुग्ध व्यावसायिकांनी रेड्यांची सजावट करून पूजन व आरती केली. त्यानंतर मिरवणूक मार्गावर असलेल्या म्हसोबा महाराज तसेच गंगाघाट, पंचवटी कारंजा, दिंडोरीरोड येथील म्हसोबा महाराज मंदिरात दर्शनासाठी नेले होते.

Web Title: Pruning procession of bellipatipadamita

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.