इंदिरानगरला मान्सूनपूर्वी झाडांच्या फांद्यांची छाटणी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:29+5:302021-05-25T04:15:29+5:30
नाशिक : इंदिरानगर पाथर्डी रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्याने त्यांचा विद्युत तारांना अडसर निर्माण झाला होता. या फाद्यांमुळे विद्युत ...
नाशिक : इंदिरानगर पाथर्डी रस्त्याकडेला असलेल्या झाडांच्या फांद्या वाढल्याने त्यांचा विद्युत तारांना अडसर निर्माण झाला होता. या फाद्यांमुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते. अखेर महावितरणकडून मान्सूनपूर्व कामांतर्गत या झाडांच्या फाद्यांची छाटणी केली असून, परिसरातील विद्युत तारा मोकळ्या केल्या आहेत.
शरयूनगर रस्त्यावर कचऱा फेकण्याचे प्रकार
नाशिक : इंदिरानगर भागातील शरयूनगर रस्त्यावर सऱ्हास कचरा फेकण्याचा प्रकार सुरू आहे. टाळेबंदीमुळे या रस्त्यावरील वर्दळ घटली असल्याने निर्मनुष्य असलेल्या रस्त्यावर परिसरातील नागरिकांकडून भरदिवसा कचरा फेकला जात आहे. अशाप्रकारे रस्त्याकडेला कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----
शहरातील रस्त्यांच्या दुभाजकांची दुरवस्था
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. इंदिरानगर पाथर्डी रस्त्यावरील दुभाजकातील शोभेच्या फुलांची रोपे वाळली असून, याठिकाणी गवत वाढले आहे. तर गंजमाळ परिसरातील रस्त्याच्या दुभाजकावर कचरा फेकला जात असल्याने या दुभाजकाची कचराकुंडी झाली आहे. नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील दुभाजकावरही मोठ्या प्रमाणात बोगन वेल वाढल्याने या दुभाजकाचीही दुरवस्था झाली आहे.
---
शहरातील रस्त्यांवर वर्दळ वाढली
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा नागरिकांना विसर पडला असून, शहरातील रस्ते आणि जॉगिंग ट्रॅकवर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. त्याचप्रमाणे भाजी बाजारातही नागरिकांकडून ७ ते ११ वाजेपर्यंतची वेळ पाळली जात नसून, अकरा वाजल्यानंतरही अनेक भाजी व फळ विक्रेते रस्त्यावर मालाची विक्री करताना दिसून येतात.