नववर्षानिमित्त रंगला कलाविष्काराचा कुंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:02 AM2019-04-02T01:02:25+5:302019-04-02T01:02:36+5:30

शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील आचार्यांसह त्यांचे विद्यारत शिष्य अशा सुमारे एक हजार कलाकारांनी एकत्रित सांस्कृतिक सोहळा साजरा केला.

Puberty | नववर्षानिमित्त रंगला कलाविष्काराचा कुंभ

नववर्षानिमित्त रंगला कलाविष्काराचा कुंभ

Next

नाशिक : शहरातील शास्त्रीय संगीतातील गायन, वादन आणि नृत्य क्षेत्रातील आचार्यांसह त्यांचे विद्यारत शिष्य अशा सुमारे एक हजार कलाकारांनी एकत्रित सांस्कृतिक सोहळा साजरा केला.
आधुनिक वाल्मीकी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विकास मंडळाच्या नववर्ष स्वागत समितीतर्फे हिंदू चंद्र नववर्षानिमित्त ‘अंतर्नाद’ सोहळ्यात स्वर, ताल नृत्याच्या संगमातून आहद आणि अनाहदच्या सुंदर मिलाफाची अनुभूती मिळविण्याची संधी नाशिककरांना मिळाली. प्रारंभी लहान गटातील कलाकारांनी अलापी गायनाविष्कारात गुरुवंदना सादर केली. त्यानंतर राग यमनमधील गायनाविष्कारासह तबला व सिंथेसायझरसोबतच ध्वनीमुद्रित संगीतावर कथ्थक नांंदी व भरतनाट्यममधील प्रणम्य सिरसा देवम नृत्याविष्कार, राग वृंदावनी सारंगमध्ये बासरीवादनासह तबल्याची साथसंगत केली.
सांस्कृतिक सोहळ्याने गोदाघाटावर रंगला ‘अंतर्नाद’
तबला, बासरी, सिंथेसायझर, व्हायोलिन, हार्मोनियमच्या साथीने भरतनाट्यम, कथ्थक व भजनांद्वारे अलापी, तराना, मालकंस, केदार आदी शास्त्रीय रागांतील बंदिशींच्या सादरीकरणातून सोमवारी (दि.१) गोदाकाठावर अनोख्या कलाविष्काराचा कुंभ रंगला. हा सोहळा पाहण्यासाठी गोदाघाटावर गर्दी झाली होती.
बासरीवादनात तराना सादर करताना राग भूपमधील त्रितालासह विविध बंदिशींचे गायन, कथक, भरतनाट्यमच्या नृत्याविष्कारानंतर कथक व तबल्याची जुगलबंदी अनुभवण्याची संधी नाशिककरांना मिळाली. अखेरच्या सत्रात श्री रामचंद्र कृपाळू भजमन, पायोजी मैंने राम रतन धन पायो व अगा वैकुंठीचा राया या भजनांसह विठ्ठल गजराने अंतर्नाद सोहळा रंगला.

Web Title: Puberty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.