सत्यशोधक युवा सभेतर्फे स्वच्छतेबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:23 AM2018-02-24T00:23:19+5:302018-02-24T00:23:19+5:30
मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
संगमेश्वर : मोसमनदी स्वच्छतेसंबंधी येथील सत्यशोधक युवा सभेतर्फे फलकाद्वारे जनजागृती केली जात आहे. महात्मा फुले रोडवरील सत्यशोधक मैदानावर यासाठी विशेष चित्रमय फलक लावून कालची आणि आजची नदीची स्थिती यावर फलक प्रदर्शन मांडण्यात आले आहे. मोसमनदीस आलेले गटारगंगेचे स्वरूप, एकेकाळी असलेली पवित्र मोसमनदी कोणी अस्वच्छ केली, नदी स्वच्छतेचे मार्ग शोधू या तसेच माझा काय दोष? आई ना मी तुमची, मला उत्तर द्या असे भावनिक मुद्दे फलकाद्वारे उपस्थित करण्यात आले आहेत. नदीची विदारक स्थिती चित्राद्वारे फलकात दाखविण्यात आली आहे. नदी स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन सत्यशोधक युवा सभेने केले आहे. फलक प्रदर्शन बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. सुभाष परदेशी, उमेश अस्मर, सोमनाथ वडगे, राकेश माळी, अरविंद पवार, संजय जोशी, शैलेंद्र परदेशी, भिला महाजन आदींसह कार्यकर्ते यासाठी परिश्रम घेत आहेत.