भगूर नगरपालिकेत गोवर, रुबेलाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:16 AM2018-11-28T00:16:48+5:302018-11-28T00:17:26+5:30

शहर निरोगी असावे आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी नगरसेवक व शहरातील डॉक्टरांनी पालिका सभागृहात जनजागृती चर्चासत्र घेऊन डॉक्टरांनी गोवर, रुबेला व इतर जीवघेण्या आजारांबाबत विशेष मार्गदर्शन केले

 Public awareness about goauver, rubella in Bhagur Municipality | भगूर नगरपालिकेत गोवर, रुबेलाबाबत जनजागृती

भगूर नगरपालिकेत गोवर, रुबेलाबाबत जनजागृती

Next

भगूर : शहर निरोगी असावे आणि नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे यासाठी नगरसेवक व शहरातील डॉक्टरांनी पालिका सभागृहात जनजागृती चर्चासत्र घेऊन डॉक्टरांनी गोवर, रुबेला व इतर जीवघेण्या आजारांबाबत विशेष मार्गदर्शन केले  यावेळी भगूर नगरपालिका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी, खासगी डॉ. वसंत जगताप, डॉ. विजय गवळी, लक्ष्मीकांत नांदेडकर, डॉ. सरोजिनी कापसे यांनी सभागृहात मार्गदर्शन करताना सांगितले की, गोवर व रु बेलाची लस नऊ महिने ते १५ वर्षे बालकांना आवश्यक द्यावीच शिवाय छोटा-मोठा आजार सुरू झाल्यास प्रथम दवाखान्यात जाऊन डॉक्टरकडूनच इलाज करून घ्यावा व तंदुरुस्त राहावे तसेच डॉ. निकम, डॉ. शेख यांनी टीबी व इतर आजारविषयी माहिती सांगितले, तर लवकरच भगूर शहरातील सर्व अंगणवाडी, विविध शाळेतील विद्यार्थी तपासणी करून आजारमुक्त लसीकरण करण्यात येणार असल्याचे शेवटी वैद्यकीय अधिकारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष अनिता करंजकर, मुख्याधिकारी प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे, आरोग्य सभापती संगीता पिंपळे, नगरसेवक मोहन करंजकर संजय शिंदे, दीपक बलकवडे, नगरसेवक मनीषा कस्तुरे, स्वाती झुटे, अनिता ढगे, कविता यादव, अश्विनी साळवे, स्वच्छतादूत अनिल पवार, श्याम ढगे संग्राम करंजकर, अंगणवाडी सेविका मदतनीस नागरिक व समाजसेवक उपस्थित होते.

Web Title:  Public awareness about goauver, rubella in Bhagur Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.