अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:22 PM2018-10-18T23:22:36+5:302018-10-19T00:10:51+5:30

ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी वाहनधारकानी हॉर्नचा कमीत कमी वापर करावा तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन करावे याबाबत आज अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

Public awareness about loudspeakers on behalf of Ambad police station | अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती

अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती

Next
ठळक मुद्देवाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

सिडको : ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी वाहनधारकानी हॉर्नचा कमीत कमी वापर करावा तसेच वाहतुकीचे नियमांचे पालन करावे याबाबत आज अंबड पोलीस ठाण्याच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या वाहनधारकांचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
अंबड पोलीस स्टेशनच्या वतीने पाथर्डीफाटा फाटा येथे नो हॉर्न डे साजरा करण्यात आला. या मोहिमेत ज्या वाहनधारकांनी वाहतुकीचे नियम पाळत सिट बेल्ट व हेल्मेट घातले होते अशा चारचाकी व दुचाकी वाहनधारकांचे पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे याच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले, तर वाहतुकीचे नियम मोडणाºयांवरदेखील दंडात्मक कारवाई न करता त्यांनाही ध्वनिप्रदूषण टाळण्यांसाठी हॉर्नचा वापर टाळा, तसेच वाहतुकीचे नियम पाळा याबाबत प्रबोधन करण्यात आले. शहरातील विविध रस्त्यांवर वाढते अपघात बघता नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी यासाठी शहर पोलिस शाखेच्या वतीने विविध उपकम राबविण्यात येत आहेत. यावेळी पोलिसांनी जनजागृती फलक लावून वाहनधारकाचे प्रबोधन करण्यात आले होते.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक हरेश्वर घुगे, प्रशांत नागरे, व्ही. आर. शिपी, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोराडे, जयश पोकळे आदी सहभागी झाले होते.

दंडात्मक कारवाई टाळणार
स्थळ : पाथर्डीफाटा परिसर, वेळ: सकाळी ११ वाजेची. पाथर्डीफाटा येथे प्रंचड पोलीस फौजफाटा पाहून सुरुवातीस येथून जाणाºया दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पोलिसांकडून कारवाई करीत असल्याची भीती मनपा आली होती, परंतु काही वेळातच पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळणाºयांना गुलाब पुष्प देताना वाधनधारक पाहतात. यानंतर वाहनधारकांना समाधान वाटते. यावेळी वातुकीचे नियम न पाळणाºया वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई न करता त्यांनाही चूक सुधारण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा याबाबत जनजागृती करण्यात आली.

Web Title: Public awareness about loudspeakers on behalf of Ambad police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.