विवाहपत्रिकांबाबत सामाजिक संघटना करणार जनजागृती़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:16 AM2018-05-12T00:16:02+5:302018-05-12T00:16:02+5:30

विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ या प्रश्नाची सुशिक्षित नागरिक, लॉन्स व मंगल कार्यालयचालक यांच्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे़

Public awareness about marriage arrangements by social organizations | विवाहपत्रिकांबाबत सामाजिक संघटना करणार जनजागृती़

विवाहपत्रिकांबाबत सामाजिक संघटना करणार जनजागृती़

Next

नाशिक : विवाहाच्या आमंत्रणपत्रिका वाटताना होणारी कुटुंबीयांची धावपळ, दुर्दैवी अपघात तसेच या घटनांमुळे हानी झालेल्या कुटुंबीयांची मानसिक अवस्था, आर्थिक हानी या सोशल मीडियावरील व्हायरल संदेशानंतर ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ या प्रश्नाची सुशिक्षित नागरिक, लॉन्स व मंगल कार्यालयचालक यांच्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांनीही दखल घेतली आहे़
या संघटनांच्या अध्यक्षांनी जनमानसातील जनजागृतीसाठी पुढाकार घेणार असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत़  विवाहपत्रिका वाटपाबाबत ‘लोकमत’ने ७ मेपासून जनजागृती अभियान सुरू केले़ या अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियावर लोकमतमध्ये प्रकाशित झालेली ‘लग्नपत्रिका असेल तरच लग्नाला जायचे का?’ ही बातमी पाठविली गेली़  लोकमतच्या या अभियानास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून, पुढील वर्षीपासून पत्रिका वाटप बंद असा संकल्पही केल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत़ लग्नपत्रिका वाटणे हे कष्टदायक काम़ चुकून एखाद्या नातेवाईकास किंवा मित्रास पत्रिका द्यायची राहून गेल्यास रुसवा-फुगवा आणि नाराजी ओढवून घ्यावी लागते. ज्याच्या घरी लग्न आहे त्याला मदत करण्यापेक्षा पत्रिका मिळाली नाही म्हणून जाहीर नाराजी व्यक्त करतात़ या कालावधीतील अपघात पाहता लग्नपत्रिका घरपोच मिळालीच पाहिजे ही मानसिकता बदलली पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा दूरध्वनीचा वापर करण्यासाठी जनजागृती करणार आहोत़
- बाळासाहेब पोरजे, माजी अध्यक्ष, न्यू गोदावरी ज्युनिअर चेंबर, सातपूर
माहिती तंत्रज्ञानातातील क्रांतीबरोबरच सामाजिक क्रांतीही गरजेची आहे. विवाहाच्या आमंत्रणपत्रिका घरोघरी वाटत बसण्यापेक्षा सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून निमंत्रण देणे काळाची गरज झाली आहे. सद्यस्थितीत प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने हे काम तर अधिकच सोपे झाले आहे़ त्यामुळे नातेवाइकांनीही आपला समंजसपणा दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे़ याबाबत प्रवर्तक संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे़- बजरंग शिंदे, अध्यक्ष, प्रवर्तक सामाजिक विकास संस्था, नाशिक
सध्याच्या धावपळीच्या युगात गावोगावी जाऊन लग्नपत्रिका वाटप करणे वेळेअभावी शक्य नाही. त्यामुळे काळानुसार आपण बदलले पाहिजे. लग्नपत्रिका घरपोहोच मिळाली तरच लग्नाला जाऊ ही मानसिकता बदलून नवीन साधनांची मदत घेण्याचा सल्ला द्यायला हवा़ सोशल मीडियाचा वापर करून अथवा दूरध्वनीद्वारे आमंत्रण देण्याबाबत जनजागृती करण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेणार आहे़ - बाळासाहेब जाधव  , अध्यक्ष, जनविकास फाउंडेशन, सातपूर

Web Title: Public awareness about marriage arrangements by social organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.