पंचाळे येथे शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 05:56 PM2019-03-13T17:56:31+5:302019-03-13T17:56:44+5:30
सिन्नर : भारत सरकारच्या ‘सेव्ह द चिल्ड्रन’ जिल्हा परिषद नाशिक व सोनी याय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पंचाळे येथील प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
सिन्नर : भारत सरकारच्या ‘सेव्ह द चिल्ड्रन’ जिल्हा परिषद नाशिक व सोनी याय यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पंचाळे येथील प्राथमिक शाळेत शिक्षणाच्या अधिकाराबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात आली.
प्रत्येक विद्यार्थ्यास शाळेच्या प्रवाहात आणून त्यात सातत्य ठेवणे, बालमजुरीचे प्रमाण कमी करणे, मुलामुलींची शालेय शिक्षणातील प्रमाण वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी ११ व १२ मार्च दरम्यान पंचाळे येथील सभागृहात दोन दिवसीय पथनाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत पंचाळे पांगरी, शहा, मीठ-सागरे, उजनी व दहिवडी येथील प्राथमिक शाळेतील प्रत्येकी आठ प्रमाणे एकूण ४८ विद्यार्थ्यांना पथनाट्य प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या या विद्यार्थ्यांनी गावातील मध्यवर्ती ठिकाणी पथनाट्य सादरीकरणातून बालकांचे हक्क, मुलींना - मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, शाळाबाह्य विद्यार्थी संख्या कमी करणे या विषयांवर प्रकाशझोत टाकला. तसेच यानिमित्ताने गावातून शिक्षण हक्का बाबत जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.