सातपूरला प्रशासन-लोकप्रतिनिधींकडून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:03+5:302021-08-01T04:14:03+5:30
कोरोना आजाराने सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेले असताना आता सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ आणि १० मध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया ...
कोरोना आजाराने सर्वसामान्य नागरिक भयभीत झालेले असताना आता सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ आणि १० मध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजाराने नागरिक हैराण झाले आहेत. प्रभाग सभापती योगेश शेवरे, मनसे गटनेता सलीम शेख यांनी मलेरिया कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेऊन तातडीच्या उपाय योजना करण्याचे निर्देश दिले आहेत. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने उपाययोजना करण्याबरोबरच जनजागृतीवर भर दिला जात आहे. प्रभाग सभापती योगेश शेवरे, नगरसेविका इंदूबाई नागरे, विभागीय अधिकारी नितीन नेर यांच्या नेतृत्वाखाली सामान्य प्रशासन विभागाचे तानाजी निगळ, मलेरिया विभागाचे सलीम शेख मोहम्मद, राजेश गायकवाड, अरविंद मून, विजय गवारे, भारत शिंदे, गौतम वानखेडे, तुकाराम पोटिंदे आदींसह संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, जाधव संकुल, राज्य कर्मचारी वसाहत, वास्तूनगर, नागरे चौक, संभाजी चौक, पवार संकुल आदी परिसरातील घरोघरी जाऊन साथीच्या रोगांपासून बचाव करण्यासाठी कशी काळजी घ्यावी, याविषयी माहिती देऊन जनजागृती करीत आहेत.
$$ रायगड प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष समाधान देवरे आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक १० मधील अशोकनगर, राज्य कर्मचारी वसाहतीत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया या साथीच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रास कटिंग मशीनने रस्त्याच्या कडेचे गवत कापणे, हॅण्ड पंपाद्वारे जंतुनाशक औषध फवारणी करणे, जनजागृती रथ तयार करून मोहीम राबविण्यात येत आहे.
(फोटो ३१ सातपूर) प्रभाग क्रमांक १० मध्ये साथरोग आजाराविषयी घरोघरी जाऊन जनजागृती करताना नगरसेविका इंदूबाई नागरे, योगेश शेवरे, नितीन नेर, तानाजी निगळ, राजेश गायकवाड, अरविंद मून, विजय गवारे, भारत शिंदे, गौतम वानखेडे, तुकाराम पोटिंदे आदी.