म्हाळुंगी नदीच्या जलपूजनासोबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 05:26 PM2019-07-12T17:26:16+5:302019-07-12T17:27:01+5:30
सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालय व ग्रामस्थांच्यावतीने म्हाळुंगी नदीपात्रात जलपूजन करण्यात आले.
मेघ राजा बरसू लागला व विश्राम गडाच्या पायथ्याशी म्हाळुंगीच्या उगमातून वाहणारी म्हाळुंगी नदीचे पात्र वाहू लागले. पाडळीच्या नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाहू लागला आणि ग्रामस्थाच्या आनंदाला उधाण आले. शेतकऱ्यांची जीवन वाहिनी असलेल्या नदीचे जलपूजन ग्रामस्थ व विद्यालयाने करण्याचे ठरविले. सरपंच अरूणा रेवगडे यांच्या हस्ते नारळाची ओटी भरण करून जलपूजन केले. यावेळी आशापूरचे सरपंच विष्णूपंत पाटोळे, हिवरेचे सरपंच केशव सहाणे व मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपसरपंच भगीरथ रेवगडे, चंद्रभान रेवगडे, सदस्य रामभाऊ रेवगडे, योगेश रेवगडे, गणेश रेवगडे, रामचंद्र शिंदे, रामलाल रेवगडे, रामभाऊ सहाणे, अर्चना रेवगडे व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपशिक्षक बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. टकर, आर. टी. गिरी, एम. सी. शिंगोटे, एम. एम. शेख, सविता देशमुख, टी. के. रेवगडे, सी.बी.शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस. डी. पाटोळे, आर. एस. ढोली, के. पी. साठे, ए. बी. थोरे हे उपस्थित होते.