डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 07:29 PM2018-08-03T19:29:39+5:302018-08-03T19:29:43+5:30
खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे गेल्या महिन्याभरात डेंग्यूसदृश आजाराचे चार रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधनात्मक उपायांसाठी गावात जनजागृती केली जात आहे.
आयुर्वेदिक दवाखान्याचे अधिकारी डॉ. एस. डी. दाणी, दापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ एन. डी. म्हसे आदींसह प्रयोगशाळा सहाय्यक, आशा कार्यकर्त्या दोन दिवस पासून गावात जनजागृती करत आहे. घरोघरी जाऊन डेंग्यू या आजाराचे लक्षणे व कसा होतो याबाबतची माहिती देत आहे. आठवड्यातून एकदा पाणी साठवणुकीचे सर्व साधन स्वच्छ करावे असे आवाहन करण्यात आले.