बाल हक्क, सुरक्षितता संदर्भात जनता विद्यालयात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 05:52 PM2019-11-18T17:52:04+5:302019-11-18T17:52:41+5:30

लोहोणेर : संयुक्त राष्ट्र संघाचे बालकांचे हक्क यावरील झालेले अधिवेशन बुधवारी (दि.२०) तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सर्वत्र बालकांची सुरक्षितता यासंदर्भात जनजागृती सप्ताह राबविण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.

Public awareness in the Janata Vidyalaya regarding child rights, safety | बाल हक्क, सुरक्षितता संदर्भात जनता विद्यालयात जनजागृती

लोहोणेर येथील जनता विद्यालयात विध्यार्थीना मार्गदर्शन करताना पोलीस उप निरीक्षक महेश निकम समवेत मुख्याध्यापक रवींद्र भदाणे.

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व बालकांविरु द्ध अत्याचार याविषयी माहिती

लोहोणेर : संयुक्त राष्ट्र संघाचे बालकांचे हक्क यावरील झालेले अधिवेशन बुधवारी (दि.२०) तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचे औचित्य साधून संपूर्ण राज्यात सर्वत्र बालकांची सुरक्षितता यासंदर्भात जनजागृती सप्ताह राबविण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.
सदर सप्ताह महाराष्ट्र पोलीस महिला व बालकल्याण विभाग शिक्षण विभाग चाईल्ड लाईन व युनिसेफ यांचे संयुक्त विद्यमाने १४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने येथील जनता विद्यालयात देवळा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक महेश निकम यांनी विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क व बालकांविरु द्ध अत्याचार याविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांनी त्यासंदर्भात कसा प्रतिबंध करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक रवींद्र भदाणे होते. तर व्यासपीठावर पर्यवेक्षिका कल्पना काळे पोलीस हवालदार प्रकाश सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भामरे, महिला नाईक विनता बर्डे, उत्तम भदाणे आदी उपस्थित होते.
यावेळी माध्यमिक शिष्यवत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत आलेली दिव्या साखरे या विद्यार्थिनीचा मविप्र संस्थेने दिलेला दोन हजार रु पयांचा चेक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. राकेश थोरात यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

चौकट....
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पोलीस काका व पोलीस दीदी यासारखे प्रभावी उपक्र म पोलीस स्टेशन मार्फत राबवण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मुक्तपणे संवाद साधावा यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना १०९८ व १०० हेल्पलाइन नंबर देऊन आपली काही तक्र ार असेल तर विनासंकोच फोन करावा असे निकम म्हणाले.
 

Web Title: Public awareness in the Janata Vidyalaya regarding child rights, safety

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.