सटाण्यात जनजागृती फेरी : विविध कार्यक्रमांचे आयोजन महाअवयवदान महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 12:51 AM2017-09-01T00:51:27+5:302017-09-01T00:51:51+5:30
सटाणा : महाअवयवदान महोत्सव व सप्ताहांतर्गत येथील पंचायत समिती, मराठा इंग्लिश स्कूल आणि जिजामाता गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. ३१) शहरातून महाअवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली.
येथील जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या प्रांगणातून फेरीला सुरुवात झाली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदा सुवर्णकार यांच्या हस्ते फेरीचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी डॉ. सुवर्णकार यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाºयांना अवयवदानाचे महत्त्व पटवून दिले. अवयव प्रत्यारोपण हा आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीचा एक चमत्कार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शरीरातील एखादा अवयव विविध उपचारांनी बरा न होता कायमचा निकामी होऊन एखादा रुग्ण मृत्युपंथाला लागतो. अशावेळी दुसºया कोणा जिवंत वा मेंदुमृत व्यक्तीचा तो अवयव सुदृढ अवस्थेत मिळाला तर त्याचे प्रत्यारोपण करून शस्त्रक्रिया यशस्वी करता येते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानासाठी पुढे यावे, असे आवाहन डॉ. सुवर्णकार यांनी केले. जिजामाता हायस्कूलपासून सुरू झालेली फेरी ताहाराबाद रोड या प्रमुख मार्गाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा, यशवंतराव महाराज मंदिर मार्गाने पुढे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आली. येथे फेरीचा समारोप करण्यात आला. यावेळी सहभागी विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षक, कर्मचाºयांना वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप नरवटे यांनी अवयवदानाची प्रतिज्ञा दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत कापडणीस, डॉ. पंकज शिवदे, मोहनकुमार देवरे, अजित भामरे, किरण शेवाळे, पंकज जाधव, राजेंद्र भदाणे, विजय देवरे आदी उपस्थित होते.