कांदा परिषदेसाठी ग्रामीण भागात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:48 PM2019-02-20T16:48:11+5:302019-02-20T16:48:27+5:30
खामखेडा : गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याला योग्य भाव मिळत नाही, कांद्याला चांगला भाव मिळावा म्हणून आमदार बच्चु कडू यांच्या उपस्थित कांदा परिषदेसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले जनजागृती करत आहेत.

गेल्या तीन हंगामापासून कांदा हा कवडीमोल भावाने विकला जात आहे. काही शेतकºयांनी कांदा रस्त्यावर फेकला. त्यामुळे कांदा पिकावर केलेला उत्पादन खर्च सुद्धा भरून निघाला नाही. त्यामुळे शेतकºयाची परिस्थिती हलाकीची झाली आहे. या परिस्थतीत बदल व्हावा व कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, सिन्नर फाटा, नाशिकरोड, नाशिक येथे आमदार बच्चु कडू यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे. यासाठी ग्रामीण भागातील शेतकºयांची मुले प्रत्येक गावात फिरुन जनजागृती करीत आहे.
(फोटा २० खामखेडा कांदा) उन्हाची परवा न करता कांदा परिषदेची पत्रक वाटून जनजागृती करतांना शेतकºयांची मुले.