रु बेला लसीकरणाबाबत ग्रामीण रु ग्णालयाकडुन जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 04:32 PM2018-10-28T16:32:09+5:302018-10-28T16:33:12+5:30

उमराणे : येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने गोवर व रु बेला लसीकरणाबाबत छत्रपती शिवाजी मराठा विद्यालयाच्या मदतीने संपूर्ण गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली.

 Public awareness through Rural Ruins for Rural Vaccination | रु बेला लसीकरणाबाबत ग्रामीण रु ग्णालयाकडुन जनजागृती

 उमराणे येथील ग्रामीण रु ग्णालयाच्यावतीने गोवर व रु बेला लसीकरण जनजागृती रॅलीत सहभागी झालेले डॉ. दिपक पवार,छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक साबळे तसेच शालेय विद्यार्थी व रु ग्णालयाचे कर्मचारी. 

Next
ठळक मुद्दे ही लस नोव्हेंबर ते डिसेंबर मिहन्यात देण्यात येणार असल्याचे ग्रामीण रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. पवार यांनी सांगितले.



उमराणे : येथील ग्रामीण रु ग्णालयाच्या वतीने गोवर व रु बेला लसीकरणाबाबत छत्रपती शिवाजी मराठा विद्यालयाच्या मदतीने संपूर्ण गावातुन जनजागृती रॅली काढण्यात आली. रु ग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दिपक पवार यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या गोवर व रु बेला (खसरा) लसीकरण जनजागृती मोहीमेत नऊ महिन्यांपासुन पुढील व पंधरा वर्षांच्या आतील सर्व बालकांना लस देऊन घेणे, यापुर्वी लस दिली गेली असली तरी पुन्हा लस देणे याबाबत प्रबोधन करण्यात आले. गोवर व रु बेला जनजागृती रॅलीत जि. प.सदस्य यशवंत शिरसाठ, माजी जि.प.सदस्य प्रशांत देवरे, पं.स.सदस्य धर्मा देवरे, सरपंच सोनाली देवरे, बाजार समतिीचे माजी सभापती विलास देवरे, रु ग्णालयाचे डॉ. वैभव पाटील, डॉ.प्रियंका गोडे, छत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.झेड.साबळे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच रु ग्णालयाचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ सहभागी झाले होते. 

Web Title:  Public awareness through Rural Ruins for Rural Vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.