पाणी स्वच्छतेबाबत चित्ररथाद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 01:34 AM2018-12-01T01:34:57+5:302018-12-01T01:35:13+5:30
राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइडी व्हॅनद्वारे स्वच्छतेविषयी गावात जनजागृती करण्यात येणार आहे.
नाशिक : राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेविषयक जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यात या एलइडी व्हॅनचा शुभारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्याहस्ते करण्यात आला. या एलइडी व्हॅनद्वारे स्वच्छतेविषयी गावात जनजागृती करण्यात येणार आहे.
यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती यतिंद्र पगार, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, अशोक डोंगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदीप चौधरी, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशादिन शेळकंदे आदी उपस्थित होते.
यावेळी सांगळे यांनी सांगितले की, शासनाकडून निवडलेल्या सर्व गावात प्रभावीपणे या माध्यमाचा उपयोग करून स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाईल. या एलइडी व्हॅनच्या-माध्यमातून जिल्हास्तरावर शाश्वत स्वच्छता, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालयाचा वापर व स्वच्छता व अन्य पाणी व स्वच्छता विषयाची ग्रामस्तरावर व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे.
पाणीपुरवठा स्वच्छता विषयक संदेश प्रसारित करण्यासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, एलइडी व्हॅनच्या-माध्यमातून जिल्ह्यातील १५० गावात पाणी व स्वच्छतेबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा व स्वच्छता विषयाचे संदेश प्रसारित करण्यासाठी एलइडी व्हॅन मिळाली असून, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचे मार्गदर्शनात, तर पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्या उपस्थितीत या एलइडी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनप्रसंगी जिल्हा कक्षातील संदीप जाधव, रवि बाराथे, माधवी गांगुर्डे, भाग्यश्री बैरागी, सागर रोडे आदी उपस्थित होते.