मालेगावातील ३८ गावांमध्ये जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:12 AM2021-04-05T04:12:52+5:302021-04-05T04:12:52+5:30
सौंदाणेत ग्रामस्थांना मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दी करू नये याबाबत जनजागृती केली जात आहे. जंतू नाशक व ...
सौंदाणेत ग्रामस्थांना मास्क वापरणे, हात धुणे आणि गर्दी करू नये याबाबत जनजागृती केली जात आहे. जंतू नाशक व औषधांची फवारणी केल्याचे सरपंच पवार यांनी सांगितले. आज मालेगाव शहरात एक हजार ९५८ म्हणजे जवळपास दोन हजार बाधित आहेत, तर मालेगाव तालुक्यात ८६५ बाधित उपचार घेत आहेत. मालेगाव तालुक्यातील ३८ गावांमध्ये जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यात प्रामुख्याने कळवाडी, देवघट, चिंचगव्हाण, चिखल ओहोळ, सवंदगाव, सौंदाणे, अजंग, आघार, पिंपळगाव, रावळगाव, दाभाडी, वडेल, तळवाडे या गावांमध्ये सध्या जनता कर्फ्यू सुरू आल्याची माहिती गट विकास अधिकारी देवरे यांनी दिली. तालुक्यात आतापर्यंत ३ हजार ४५० बाधित मिळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण सौंदाणे येथे आहेत. सध्या १२३ बाधित उपचार घेत आहेत. २ हजार ५०८ बाधितांवर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत मालेगाव तालुक्यातील ७७ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. खासगी रुग्णालयात ५९ बाधित उपचार घेत आहेत, तर ७४५ बाधित घरीच होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. तालुक्यात एकूण ८६५ ॲक्टिव्ह बाधित रुग्ण आहेत, तर १०८ जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पाठविण्यात आले आहेत. तालुक्यात सर्वच गावांमध्ये ग्राम पंचायती मार्फत औषध फवारणी सुरू असून मास्क न वापरणाऱ्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. कॅन्टोनमेंट झोनचे योग्य प्रकारे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
===Photopath===
040421\04nsk_23_04042021_13.jpg
===Caption===
मालेगाव तालुक्यात दुकानांवर कारवाई करताना कर्मचारी