जळगाव नेऊरला जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:14 PM2020-05-08T22:14:40+5:302020-05-09T00:02:02+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जळगाव नेऊर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पाच दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव नेऊर : येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातही कोरोनाने शिरकाव केल्याने जळगाव नेऊर ग्रामस्थांनी संपूर्ण गाव पाच दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
जळगाव नेऊर येथे दि. १० मे पर्यंत पाच दिवस शंभर टक्के जनता कर्फ्यू पाळला जात आहे. अत्यावश्यक सेवेसह सर्वच व्यवहार पाच दिवस पूर्ण बंद ठेवण्यात आले आहे. सोमवारी, दि. ११ मे रोजी एक दिवसासाठी सर्व सेवा व व्यवहार सुरू होतील. त्यानंतर पुन्हा मंगळवार, दि. १२ ते शनिवार १६ मे पर्यंत पुन्हा पाच दिवस जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे. जनता कर्फ्यूमध्ये बँक आॅफ बडोदा शाखा, ग्राहक सेवा केंद्रही बंद राहणार आहे. औषधी सेवा सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत सुरू राहील.
गावात स्वयंसेवकांची एक टीम तयार करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून गावात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. अर्चना शिंदे, मच्छिंद्र शिंदे, प्रकाश वाघ, कैलास कुºहाडे, प्रकाश शिंदे, संतोष राजगुरू, संदीप शिंदे, ग्रामसेवक बाळनाथ बोराडे, पांडुरंग म्हस्के, शांताराम शिंदे,सनी गुळे, गोपी शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, सुनील गांगुर्डे, भाऊसाहेब शिंदे आदी गावात लक्ष ठेवून आहेत.