येवल्यात जनता कर्फ्यूस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:51 PM2020-06-23T17:51:58+5:302020-06-23T17:52:04+5:30
उद्यापर्यंत बंद : व्यापारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद
येवला : शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनासह शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली असल्याने या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवा (दि.२३) पासून जनता कफ्यू पाळण्यास सुरूवात झाली आहे. मंगळवार ते गुरूवार असे सलग तीन दिवस जनता कर्फ्यू सुरू राहणार असून त्यास शहरातील सर्वच व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत.
अनलॉक सुरू झाल्यानंतर शासकीय निर्देशानुसार वेळेच्या बंधनासह इतर विविध नियमांबाबत काय, कुठे व कसे सुरू राहिल याबाबत पालिका मुख्याधिकारी संगीता नांदुरकर यांनी आदेश जारी केले होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात शहरातील सम-विषम व वेळेबाबत व्यापारी संघटना प्रतिनिधींनी प्रांताधिकारी यांचेसह संबंधीत अधिकाऱ्यांची भेट घेवून वेळ वाढवून मिळावा व सम-विषम रद्द करण्यात यावे अशी मागणी केली होती. यानंतर शहरात व्यापारी व शहरवासीयांमध्ये गोंधळ निर्माण झाला असता, अधिकारीवर्गाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणेच दुकानांसाठी वेळ व सम-विषम राहिल असे जाहिर केले होते. दरम्यान, व्यापाºयांच्या बैठकीत शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार विविध व्यवसायिकांच्या संघटनांकडून दि. २३ ते २५ जून रोजी जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्याचे जाहीर करण्यात आले. दवाखाने, औषध दुकाने वगळता इतर सर्वच व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून जनता कर्फ्यूस पाठींबा दिला. तर भाजीपाला विक्र ेते, किराणा व्यावसायिकही कर्फ्यूत सहभागी झाले होते. शहरातील बाजारपेठेसह मुख्य भागात शुकशुकाट दिसून आला.