वावी परिसरात जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:01 PM2020-05-19T22:01:26+5:302020-05-20T00:03:32+5:30

कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिन्नर तालुक्यातील वावीच्या ग्रामस्थांनी व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. मंगळवारपासून (दि.१९) संपूर्ण आठवडाभर वैद्यकीयसेवा वगळता गावातील सर्व प्रकारचे व्यवहार व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे.

Public curfew in Wavi area | वावी परिसरात जनता कर्फ्यूमुळे शुकशुकाट

वावी येथे जनता कर्फ्यूच्या पाशर््वभूमीवर बाजारपेठेत असलेला शुकशुकाट.

Next
ठळक मुद्देगर्दी रोखण्यात यश : व्यावसायिकांचा प्रतिसाद

वावी : कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सिन्नर तालुक्यातील वावीच्या ग्रामस्थांनी व व्यवसायिकांनी स्वयंस्फूर्तीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू घोषित केला आहे. मंगळवारपासून (दि.१९) संपूर्ण आठवडाभर वैद्यकीयसेवा वगळता गावातील सर्व प्रकारचे व्यवहार व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहे.
नांदूरशिंगोटे परिसरात कोरोनाचा रु ग्ण आढळून आल्यानंतर गावातील युवकांनी पुढाकार घेत ग्रामविकास अधिकारी परेश जाधव यांच्याकडे जनता कर्फ्यू घोषित करण्यासाठी साकडे घातले होते. परिसरातील गावांमध्ये कोरोनासंदर्भात विविध उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे तेथील नागरिक विविध कारणे सांगत वावी गावात येत असल्याने ग्रामस्थांकडून भीती व्यक्त करण्यात येत होती. ग्रामपंचायतीकडून स्थानिक व्यावसायिकांसाठी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ निर्धारित केलेली असताना बाहेरून येणाऱ्या लोकांच्या वर्दळीमुळे व्यवसायिकांना ही वेळ पाळणे अशक्य झाले होते. त्यामुळे दिवसभर या ना त्या कारणाने बाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानिक युवकांनी व व्यवसायिकांनी पुढाकार घेत ग्रामपंचायत प्रशासनाकडे दक्षता घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार, ग्रामविकास अधिकारी जाधव यांनी ग्रामस्थांच्या समन्वय बैठकीत आठवडाभराचा जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले होते. यावेळी सर्वच व्यावसायिक आणि उपस्थित ग्रामस्थांनी देखील त्यांच्या या प्रस्तावाला सहमती दर्शवत यामुळे मंगळवारी भरवण्यात येणारा आठवडे बाजार देखील स्थगित करण्यात आला. जनता कर्फ्यू घोषित केल्यामुळे मंगळवारी सकाळपासूनच वावी गावात सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता. सकाळी आठ वाजेपर्यंत दूध संकलन केंद्रांवर असणारी वर्दळ वगळता अन्यत्र शांतता होती.
परिसरातील गावे लॉक
वावीपासून जवळच असलेल्या कणकोरी गावात करोना पॉझिटिव्ह रु ग्ण आढळून आल्यानंतर नांदूरशिंगोटेसह परिसरातील गावे खबरदारीचा उपाय म्हणून तेथील नागरिकांनी लॉक केली आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडून बाहेरून गावात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. केवळ बसस्थानकाजवळ एक रस्ता खुला ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी दिवसभर ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक तळ ठोकून आहेत. ते गावात येणाºया प्रत्येकाची कटाक्षाने नोंद घेत आहेत. यामध्ये दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन येणाºयांची नावे, गाव व कामाचे स्वरूप याबाबत नोंदी घेतल्या जात आहेत.

Web Title: Public curfew in Wavi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.