कृषी कर्ज मेळाव्यातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 05:42 PM2019-06-12T17:42:17+5:302019-06-12T17:42:29+5:30
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे स्टेट बॅँक आॅफ सिन्नर शाखेच्या वतीने नुकताच आर्थिक साक्षरता व कृषी कर्ज मेळावा पार पडला.
सिन्नर : तालुक्यातील पंचाळे येथे स्टेट बॅँक आॅफ सिन्नर शाखेच्या वतीने नुकताच आर्थिक साक्षरता व कृषी कर्ज मेळावा पार पडला.
केंद्र सरकारच्यावतीने दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात ‘बॅँक आपल्या गावी’ या उपक्रमांतर्गत गावागावांत बॅँकांचे ठेवीदार, कर्जदार यांना बॅँकेचे विविध कर्ज, गुंतवणूक, ठेवी योजनांबाबत माहिती देवून जनजागृती केली जाते. नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढून त्यांच्यात बॅँकांबाबत आत्मियता निर्माण करणे हा त्यामागे हेतू असतो. या उपक्रमांतर्गत पंचाळे येथील सामाजिक सभागृहात सिन्नर तालुक्यासाठी हा मेळावा पार पडला.
पंचाळेचे सरपंच भोमनाथ मोरे अध्यक्षस्थानी होते. या मेळाव्यासाठी स्टेट बॅँकेचे महाव्यवस्थापक संजीवकुमार, उपमहाव्यवस्थापक सुधीर भागवत, रिजनल आॅफिसर विनोदकुमार, सिन्नर शाखेचे मुख्य प्रबंधक विलास कुलकर्णी, प्रकाश मोरे, बॅँक अधिकारी शशिकांत वराडे व्यासपीठावर उपस्थित होते.