सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या स्थापनेकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2020 06:42 PM2020-08-22T18:42:23+5:302020-08-22T18:42:58+5:30
सायखेडा : गणरायाची स्थापना करण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळ क्रि याशील असतात. लोकसहभागातूनअनेक ठिकाणी तरु ण एकत्र येऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्रबोधनात्मक काम करण्यासाठी गणरायाची स्थापना करत असतात. मात्र यंदा कोरोनाचे सावट असल्याने त्याचा परिणाम गणेशोत्सव सार्वजनिक मंडळांवर देखील झाला आहे. ग्रामीण भागातही सध्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक सार्वजनिक मंडळांनी यंदा गणेशोत्सवाची स्थापना न केल्याचे दिसून आले आहे.

22 मार्च पासून देशभरातील सर्वच धार्मिक स्थळ बंद आहेत. अनेक मंदिरांमध्ये लाखो रु पयाची उलाढाल होत असताना अशी मंदिरही सरकारने बंद केली आहे. अजूनही कोरोनाचे संकट दूर होत नाही अशी परिस्थिती असल्याने गणेश उत्सवावर त्याचा परिनाम अदिसून येत आहे. गणेशोत्सव मंडळांची पंधरा दिवस गणेश स्थापनेसाठी लगबग सुरू असते. सामाजिक देणारा देखावा उभा करणे, रोषणाई निर्माण करणे, सरकारी परवानग्या काढणे अशा कामांची लगबग सुरू असते. मात्र यंदा कोरोनाची भीती व पोलिसांनी परवानगी नाकारल्याने उत्सहावर विरजन पडले असून अनेकांनी घरगुती उत्सव साजरा करण्यासच प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा गणेश स्थापनेकडे पाठ फिरवली आहे. याशिवाय गणेश उत्सव मंडळ ही त्यांच्या देणगीवर सर्व खर्च भागवत असतात. यंदा अनेक छोटे मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. अनेक व्यवसायिक आर्थिक टंचाईचा सामना करत आहेत. दुकाने अनेक महिने बंद असल्यामुळे वर्गणी देण्याची मानिसकता दुकानदारांमध्ये नसल्याने वर्गणी उभी कशी करावी असा प्रश्नही सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकार्यांना पडला होता. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेश स्थापना पासून चार हात दूर राहण्याचा निर्णय अनेक मंडळींनी घेतला असून, घरगुता स्थापनेलाच महत्त्व दिले आहे.
चौकट
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन करणे धोक्याचे होऊ शकते. त्यामुळे घरामध्ये गणेश स्थापना करण्याचे नियोजन केले.सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता कोरोना संकट दूर होण्यासाठी गणरायाला घरातून विनवणी करणार आहोत.
- गणेश मोगल, अध्यक्ष शिवरु द्र फ्रेंड सर्कल