आरोग्य विभागातर्फे शौचालय जनजागृती
By admin | Published: December 20, 2015 10:53 PM2015-12-20T22:53:46+5:302015-12-20T22:59:16+5:30
आरोग्य विभागातर्फे शौचालय जनजागृती
नाशिकरोड : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत महापालिका आरोग्य विभागातर्फे वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नाशिकरोड विभागीय कार्यालयामार्फत जेलरोड, विहितगाव, देवळालीगाव विभागीय कार्यालय, जेतवननगर, कॅनॉलरोड, फुलेनगर येथे लाभार्थी नागरिकांचा मेळावा घेण्यात आला.
नाशिकरोड विभागातील ४५०० नागरिकांचे अर्ज आले होते. त्यातील १३४१ नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये मंजूर करण्यात आले असून, त्यातील सहा हजार रुपये लाभार्थीच्या बॅँक खात्यात जमा झाले आहेत. यासाठी लाभार्थ्यांनी शौचालय बांधण्यापूर्वी व बांधून झाल्यावर त्याचा फोटो काढून ठेवावा. त्यानंतर पुढील रक्कम लाभार्थींना मिळणार आहे. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, विजय जाधव, प्रभाकर थोरात, राजू निरभवणे, अजय मोरे, एकनाथ ताठे, विजय मोरे आदिंनी नागरिकांना मार्गदर्शन केले. यासाठी महापालिकेतर्फे नवभारत सामाजिक प्रतिष्ठान, अजिंक्य इन्फ्रास्ट्रक्चर, अनिकेत मॅन्युफॅक्चरर्स, विंडोअर्स इंटरनॅशनल प्रा. लि., ओम एन्टरप्राईजेस, व्यंकटेश प्लास्टो प्रा. लि., प्रणव इंजिनिअर्स, अमोल थर्मोजेल लाईटवेट कंपनी या कंपनीत साधल्यास ते शौचालय बांधून देणार आहेत. विभागीय कार्यालयातील आरोग्यतर्फे वैयक्तिक शौचालय बांधणारा लाभार्थी माहितीसाठी माहितीपत्रके वाटप करण्यात आली.