सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:02 AM2019-04-30T01:02:16+5:302019-04-30T01:02:33+5:30
सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले.
नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दर महिन्याला गांधी विचारांचा जागर करणारी व्याख्यानमाला घेण्यात येते. त्यातील ८ वे पुष्प दि. २ मे रोजी अजित दळवी हे गुंफणार आहेत. दि. ३ मे रोजी बालभवनतर्फे उन्हाळ्याच्या सुटीनिमित्त बाल मित्रांसाठी अनिरुद्ध जोशी यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत. सभेत पार्किंग व्यवस्थेसाठी सभासद व अभ्यासिका विद्यार्थी तसेच पत्रकार यांना वाहनाला लावण्यासाठी स्टीकर देण्याचे ठरले. तसेच पे अॅन्ड पार्क व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी प्रमुखसचिव डॉ. धर्माजी बोडके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. त्याबाबतचे निर्णय आठवडाभरात घेण्यात येतील. संस्थेचे सनदी लेखापाल म्हणून हेरंब गोविलकर यांच्या गोविलकर अॅन्ड असोसिएट्स यांची नियुक्ती करण्यात आली. पुढील आठवड्यात वसंत कानेटकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त करावयाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत वेगळी सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर व डॉ. धर्माजी बोडके यांनी दिली.