लालपरी धावू लागल्याने जनजीवन पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 01:08 AM2020-09-09T01:08:25+5:302020-09-09T01:11:48+5:30
गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीमुळे नागरिकांना नातेवाइकांना भेटणे शक्य होत आहे. एका बसमधून २२ प्रवाशांना घेऊन एकेका मार्गावर सुरू झालेली बस आता वेगात धावू लागली आहे.
मालेगाव : गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरीमुळे नागरिकांना नातेवाइकांना भेटणे शक्य होत आहे. एका बसमधून २२ प्रवाशांना घेऊन एकेका मार्गावर सुरू झालेली बस आता वेगात धावू लागली आहे. कोरोनाच्या भीतीमुळे घराबाहेर न पडणारे नागरिक आता बस मधून प्रवास करू लागले असल्याने लालपरीमुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास मदत होत आहे. २० आॅगस्ट रोजी केवळ ६ हजार रुपये उत्पन्न मिळविणाऱ्या लालपरीमुळे माालेगाव आगाराला दररोज एक लाख रुपये उत्पन्न मिळू लागले आहे.
लॉकडाऊनपूर्वी एसटीला मालेगाव आगारात दररोज किमान ७ लाख रुपये उत्पन्न मिळत होते. त्यामुळे सहा लाख रुपयांचे नुकसान होत होते. २० आॅगस्ट रोजी केवळ नाशिकसाठी तीन फेºया बससेवा सुरू झाली. सद्यस्थितीत मात्र दरदिवशी ५० फेºया होत आहेत. त्यात अहमदनगर, चाळीसगाव, पाचोरा, नाशिक या मार्गावर बसेस सुरू आहेत. नाशिकसाठी १५ बसेस आहेत तर चाळीसगावसाठी दिवसभर बसेस सुरू आहेत. मालेगाव आगारातून दररोज बसेस सुमारे पाच हजार किमीचा प्रवास करीत आहेत. उद्या बुधवारपासून दुपारी दोन वाजता मालेगाव - पुणे बस सुरू होत आहे. एका सीटवर एकाच प्रवाशाला बसविण्यात येते. बस धुऊन सॅनेटाईज करून फलाटावर लावण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पहिल्या दिवशी केवळ चारच बसेस सोडण्यात आल्या होत्या. आता त्या वाढत असून बसेसला प्रवाशी मिळत असल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे. प्रवाशांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा पूर्ववत उत्पन्न मिळवू शकू असा विश्वास आगार व्यवस्थापक किरण धनवटे यांनी व्यक्त केला.
७० हजार किलो मीटर प्रवास
मालेगाव आगारातून दररोज सरासरी १ हजार ४०० प्रवासी प्रवास करीत आहेत. चालकांना वाहकाना मास्क देण्यात येतो. ४५० कर्मचारी मालेगाव एस. टी. आगारात असून, त्यात १६० चालक आणि १४२ वाहक आहेत. एका सीटवर एकच प्रवाशी बसत आहे. कर्मचाºयांना रोटेशननुसार काम देण्यात येते. आता एसटी कर्मचाºयांनाही काम मिळू लागल्याने त्यांच्यात उत्साह संचारला आहे. मालेगावच्या लालपरीने २० आॅगस्टपासून ७० हजार किलो मीटर प्रवास केला असून, लवकरच सर्व काही सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.