जनजीवन सुरळीत तर आता वीजेचा खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:51 IST2020-06-12T16:51:02+5:302020-06-12T16:51:32+5:30
लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आता वारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे.

जनजीवन सुरळीत तर आता वीजेचा खेळखंडोबा
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक- लॉक डाऊन नंतर आता जनजीवन सुरळीत होत असताना दुसरीकडे मात्र आता
वारंवार वीज पुरवठ्याने खेळखंडोबा होऊ लागला आहे. गेले दोन महिने
पावसाळापूर्व कामांसाठी शहरात वीज पुरवठा अनियमित होता. मात्र, आता
पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील वारंवार वीज पुरवठा खंडीतहोत असल्याने
नागरीक आणि व्यवसायिक त्रस्त झाले आहेत.
दरवर्षी उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढते आणि त्यामुळे वीज भारयिमन
करावे लागते. त्यामुळे नागरीकांची ओरड देखील होत असते. यंंदा २३ मार्च
पासून लॉक डाऊन असल्याने उद्योग- व्यवसाय बंद होते. साध्या टप-याही
उघड्या नव्हत्या. त्यामुळे सुरवातीला काही काळ वीजेची मागणी घटली होती.
नंतर मात्र वीजेचा खेळ सुरू झाला. महावितरणच्या वतीने पावसाळापूर्व कामे
आणि झाडांच्या फांद्याची छाटणी करण्यासाठी वीज पुरवठा खंडीत केला जात
असल्याचे सांगितले जात असले तरी यापूर्वी ज्या प्रमाणे ग्राहकांना सूचना
दिल्या जात होत्या किंवा एसएमएस पाठवले जात होते, ते बंदच होते. इतकेच
नव्हे तर हेल्पलाईनला कॉल केल्याानंतर देखील लॉक डाऊन कर्मचारी कमी
असल्याचे निमित्त केले जात होते. त्यानंतर आता लॉक डाऊनचे निर्बंध शिथील
होत असून पुन्हा उद्योग आणि बाजारपेठा सुरळीत होत आहेत मात्र आता पुन्हा
वारंवार वीज पुरवठा खंडीत होत आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये काम करणे
कठीण झाले आहेत. काही ठिकाणी कमी अधिक वीजेच्या दाबाने वीजेच्या
उपकरणांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत.