लोकसहभाग हा मविप्रचा पाया : नीलिमा पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:18 AM2021-08-21T04:18:30+5:302021-08-21T04:18:30+5:30
नाशिक : मविप्र संस्थेच्या कर्मवीरांनी स्वतःची पदरमोड करून तसेच लोकवर्गणीतून बहुजन वर्गासाठी शाळा बांधल्या, त्यामुळे सर्व बहुजनांना शिक्षणाची दारे ...
नाशिक : मविप्र संस्थेच्या कर्मवीरांनी स्वतःची पदरमोड करून तसेच लोकवर्गणीतून बहुजन वर्गासाठी शाळा बांधल्या, त्यामुळे सर्व बहुजनांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे मोठे काम कर्मवीरांनी केल्याचे नमूद करतानाच समाज हा मोठा लोकशिक्षक असून, लोकसहभाग हा संस्थेचा कायम पाया राहिलेला असल्याचे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालय व मराठा हायस्कूलसह संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस गुरुवारी (दि. १९) समाज दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यातील केटीएचएम महाविद्यालयातील समाज दिन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही.बी. गायकवाड यांच्यासह व्यासपीठावर शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे, उपप्राचार्य डॉ. पी.व्ही. कोटमे, विज्ञान विभागप्रमुख ए.डी. भालेराव, वाणिज्य विभागप्रमुख जी.आर. गोरडे, कला विभागप्रमुख एस.एन. कासव आदी उपस्थित होते. तर मराठा हायस्कूलमध्ये शाळा समिती सदस्य नथुजी देवरे यांच्या अध्यक्षतेत साजरा करण्यात आलेल्या समाज दिन सोहळ्यास माजी मुख्याध्यापक गुलाबराव भामरे यांच्यासह जगन्नाथ तिदमे, उत्तमराव मुळाणे, माणिकराव ठुबे, सुनील निरगुडे, अशोकराव जाधव, मुख्याध्यापक हरिभाऊ दरेकर, उपमुख्याध्यापक खंडेराव वारुंगसे, पर्यवेक्षक संजय डेर्ले, अंबादास मते उपस्थित होते. संस्थेच्या आदर्श शिशू विहार व अभिनव बाल विकास मंदिर गंगापूर रोड, कर्मवीर ॲड. बाबूराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, मखमलाबाद शैक्षणिक संकुलातही समाजदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
190821\174719nsk_35_19082021_13.jpg
मविप्रच्या समाजदिन सोहळ्यात बोलताना संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार